अमेरिका : मृत्यूनंतरही जीवन आहे...याबाबत तुम्ही आतापर्यंत खूप ऐकलं असेल. भारतासह अनेक देशांमध्ये मृत्यूनंतर जीवन असतं, असं मानलं जातं. हिंदू धर्माबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. यामध्येच आता cosmologist ने असा दावा केला आहे की, मृत्यूनंतरचं जीवन हे 'वैज्ञानिक शक्यतेच्या पलीकडे' आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. सीन कॅरोल हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विश्वशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. भौतिकशास्त्राच्या नियमांच्या अभ्यासासाठी त्यांनी बहुतेक आयुष्य समर्पित केलं. ते असा दावा करतात की, विश्वाचे नियम मृत्यूनंतरही चेतना कार्य करू देत नाहीत.


डॉ. कॅरोल असा दावा केला की, दैनंदिन जीवन भौतिकशास्त्राच्या नियमांद्वारे पूर्णपणे समजलं जातं. त्याचबरोबर मृत्यूनंतरही आपल्या मेंदूमध्ये साठवलेली माहिती जपून ठेवावी, असा कोणताही नियम नाही.


डॉ. सीन कॅरोल म्हणतात, चेतना ही आपल्या भौतिक शरीरापासून पूर्णपणे वेगळी असायला हवी आणि भौतिकशास्त्राचे नियम हे नाकारतात. 


कॅरोल यांच्या सांगण्यानुसार, परमाणू आणि ज्ञात शक्तींशिवाय दुसरे काहीही नाहीये म्हणून स्पष्टपणे मृत्यूनंतर आत्म्याला जिवंत राहण्याचा कोणताही आधार नाही. मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवण्यासाठी भौतिकशास्त्र आवश्यक आहे.