NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणणे शक्य होईल अनुषंगाने देखील प्लानिंग केले आहे. 


चार अंतराळवीर जाणार अंतराळात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) यांनी आर्टेमिस-II ही मोहिम हाती घेतली आहे. कमांडर रीड विझमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, मिशन स्पेशलिस्ट 1 क्रिस्टीना हॅमॉक कोच आणि मिशन स्पेशलिस्ट 2 जेरेमी हॅन्सन या चार अंतराळवीरांना आर्टेमिस-II मिशन अंतर्गत अंतराळात पाठवले जाणार आहे.


आर्टेमिस II चंद्रावर उतरणार नाही


आर्टेमिस II मोहिमेअंतर्गत अंतराळवीर चंद्रावर उतरणार माहीत. तर, ते अंतराळात चंद्राभोवती भ्रमण करणार आहेत. कारण हे यान चंद्राभोवती फिरणार आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर स्पेस स्टेशन उभारण्याच्या अनुषंगाने ही मोहिम अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 


आत्तापर्यंत अंतराळात 20 अंतराळवीरांचा मृत्यू


1986 ते 2003 पर्यंत NASA च्या अनेक मोहिमा पार पडल्या. या मोहिमेअंतर्गत अंतराळात 20 अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. 1971 च्या सोयुझ 11 मोहिमेदरम्यान तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला आणि 1967 च्या अपोलो 1 लाँच पॅडला लागलेल्या आगीत तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे.


अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर NASA काय करणार?


50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. अंतराळवीरांना निरोगी ठेवण्यासाठी संशोधक संशोधन करत आहेत.  मात्र, या मोहिमे अंतगर्त अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर काय करणार याबाबत NASA ने माहिती दिली आहे. या मोहिअंगर्त एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर सहकारी अंतराळवीर संबधीत अंतराळवीराचा मृतदेह एका कॅप्सुलच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवतील. एकदा मोहिम सुरु झाल्यावर अंतराळवीरांना मोहिम संपल्याशिवाय परत फिरणे शक्. नाही.  कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर पाठवणे शक्य न झाल्यास  चेंबरमध्ये किंवा विशेष बॉडी बॅगमध्ये हा मृतदेह जतन केला जाईल. मोहिम संपल्यानंतर इतर अंतराळवीरांसह मृत अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणला जाईल. 


चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य


चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य आहे. अत्यंविधीसाठी भरपूर ऊर्जा लागते. याशिवाय, एखाद्या व्यक्तीला जमिनीत दफन करणे देखील सुरक्षित नाही. शरीरातील बॅक्टेरिया आणि इतर जीव चंद्र तसेच मंगळग्रहावरील पृष्ठभागाला दूषित करु शकतात.