इम्रान खानचे मंत्री दहशतवादी हाफीज सईदसोबत एकाच मंचावर
पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला
नवी दिल्ली : पाकिस्तानात नव्यानंच अस्तित्वात आलेल्या इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मुंबईतील 26/11च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदसोबत इस्लामाबादमध्ये एकाच मंचावर असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
इम्रान खान सरकारमधील धार्मिक मंत्रालयाचे मंत्री नूर-उल-हक कादरी आणि हाफिज सईद 'दिफा ए पाकिस्तान' नावाच्या एका कार्यक्रमासाठी एकत्र आले. या कार्यक्रमाच्या बैठकीत भारताविरोधात पाकिस्तानी नागरिकांना एकत्र करण्याचा विडा उचलण्यात आला. बैठकीत अब्दुल रहमान लक्वी हा सुद्धा हजर होता.