इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झालेल्या इम्रान खान यांच्या नियोजित शपथविधी समारोहावरच, अनिश्चिततेचे काळे ढग जमा झाले आहेत. इम्रान खान यांचा प्रस्तावित शपथविधी समारोह थांबवण्यात यावा यासंबंधीची याचिका, इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार इम्रान खान पाकिस्तानी संसदेचे सदस्य होण्यासाठी पात्र नसल्याबाबतची ही याचिका आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमिर फारुख यांच्या न्यायालयात या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. 


तसंच निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अर्जात, इम्रान खान यांनी आपली कन्या टिरीयन व्हाईट हिचा उल्लेख केला नव्हता. तसंच इम्रान यांची पूर्वपत्नी रेहम खान यांनीही इम्रान खान यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.