नवी दिल्ली : जगात वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात काहीना काही भविष्यवाणी होत असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियात एक मेसेज प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये असं काही म्हटलं आहे ज्याच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, “१२ ऑगस्ट २०१७ रोजी रात्र होणार नाहीये, म्हणजेच रात्रीच्या वेळीही दिवसाप्रमाणेच प्रकाश असणार आहे. नासानेही हा चमत्कार इतिहासात प्रथमच होणार असल्याचा दावा केला आहे.”


व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, ९६ वर्षांत पहिल्यांदाच १२ ऑगस्ट रोजी रात्र होणार नाहीये. म्हणजेच दिवसातील २४ तासही प्रकाशच राहणार आहे. आकाशात उल्कापात होणार असल्याने प्रकाश निर्माण होणार आहे. त्यामुळे हे न पाहणा-याला मोठं नुकसान होऊ शकतं.



व्हायरल झालेल्या बातमी मागचं सत्य


खरं तर १२ ऑगस्ट रोजी रात्री आकाशात उल्कापात होणार आहे त्यामुळे रात्रीही काहीप्रमाणात प्रकाश निर्माण होणार आहे. नासानेही म्हटलं आहे की, रात्रीही दिवसाप्रमाणे प्रकाश असणार असे काहीही नाहीये.


नासाच्या साईटवर दिलेल्या रिपोर्टनुसार, १२ ऑगस्ट रोजी उल्कापात होणार आहे. त्यामुळे रात्री थोडा उजेड निर्माण होईल. प्रत्येकवर्षी तीन मोठे उल्कापात होतात. यापैकी पहिला उल्कापात हा जानेवारी महिन्यात, दुसरा उल्कापात ऑगस्ट महिन्यात तर तिसरा डिसेंबर महिन्यात पहायला मिळतो.