Naked village: काय सांगताss `या` गावात कपडे घालण्यास बंदी, खुलेआम विवस्त्र फिरतात स्त्री-पुरुष
या गावातील लोकांची जीवनशैली अतिशय प्रगत आहे. या गावात राहणाऱ्या जवळपास सगळ्यांचेच स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत. तरीही या गावात कपडे घालण्यास मनाई आहे. फक्त थंडीतच येथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी दिली जाते.
Naked village: अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यापैकी कोणत्याही एका वस्तु शिवाय मानवाच्या सुखी आयुष्याशी कल्पना करणे जवळपास अशक्य आहे. मानवाची उत्क्रांती होण्याआधी मानव प्राण्यांप्रमाणे नग्न फिरत होता. यानंतर उन, वारा, थंडी यापासून बचाव करण्यासाठी मानव झाडांची पाने शरीरावर बांधू लागला. यानंतर मानवाची उत्क्रांती होत गेली आणि आता पोशाखच मानवाची ओळख बनली आहे. वेगवेगळ्या परंपरेनुसार मानव वस्त्रे परिधान करत आहे. मात्र, आजही अनेक दुर्लभ जमातींमधील लोक अर्थ नग्न अवस्थेत राहतात. मात्र, या पृथ्वीतलावावर एक असे गाव असे जिथे कपडे घालण्यास बंदी आहे(Naked village). या गावातील स्त्री-पुरुष सगळे नग्न फिरतात. यामागे धक्कादायक कारण आहे.
संपूर्ण जगात मानव हा एकमेव प्राणी आहे जो वस्त्र परिधान करतो. यामुळेच कोणत्याही देशाच्या पेहरावाचा थेट संबंध त्या देशाच्या संस्कृतीशी असतो. पृथ्वीवर मनुष्याच्या अशा अनेक जमाती आहेत जे कपडे परिधान करत नाहीत. अनेक आदिवासी समाज कपडे घालत नाहीत. आदिवासी समाज सहसा स्वतःला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवतात(britain naked village).
ब्रिटनमध्ये स्पीलप्लात्ज (Spielplatz) नावाचे एक गाव आहे. या गावातील लोक अधिक शिक्षित आणि प्रगतशील विचारांचे आहेत. जवळपास 94 वर्षांपासून या गावातील लोकांनी कपड्यांशिवाय राहणे पसंत केले आहे. हे गाव हर्टफोर्डशायरमधील ब्रिकेटवुडजवळ आहे. या गावात स्त्री आणि पुरुष दोघांनाही नग्न राहावे लागते. विशेष म्हणजे या गावात फिरायला येणाऱ्या पर्यटकांनाही विवस्त्रच फिरावे लागते.
या गावातील लोकांची जीवनशैली अतिशय प्रगत आहे. या गावात राहणाऱ्या जवळपास सगळ्यांचेच स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत. तरीही या गावात कपडे घालण्यास मनाई आहे. फक्त थंडीतच येथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी दिली जाते.
या गावात का आहे कपडे घालण्यास बंदी?
इस्ल्ट रिचर्डसन यांना हे गाव वसवले जाते. निसर्गाच्या सहवासात राहण्यासाठी या गावाची निर्मीती करण्यात आली. यामुळेच या गावची जीवनशैली देखील तशीच पहायाला मिळते. गावातील लोक स्वतःला निसर्गाच्या जवळचे समजतात. यामुळेस येथे कपडे न घालण्याचा नियम करण्यात आला. सुरुवातील या विरोध जाला. मात्र, इस्ल्ट रिचर्डसन यांनी सर्वांचा यामागचे महत्व पटवून दिले. यानंतर येथे कपडे न घालण्याच्या नियमाला मान्यता देण्यात आली. भारतातील अंदमान बेटावर राहणारी 'जारवा' आदिवासी जमातही कोणत्याही प्रकारचे वस्त्रे परिधान करत नाही. या जमातीने देखील आपली वेगळी ओळख आजही कायम ठेवलेय.