येशू नव्हे, जिनपिंग गरिबी दूर करतील
य़ेशू ख्रिस्त नव्हे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तुमची गरिबी दूर करतील. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्तांचे फोटो काढा आणि जिनपिंग यांचे फोटो लावा
चीनमध्ये येशू ख्रिस्तांचे फोटो काढून ऱाष्ट्राध्यक्षांचे फोटो
बीजिंग : य़ेशू ख्रिस्त नव्हे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तुमची गरिबी दूर करतील. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्तांचे फोटो काढा आणि जिनपिंग यांचे फोटो लावा, असा प्रचार चीनमध्ये सरकारकडून सुरू आहे.
चीन सरकारची नवी मोहीम
चीनमध्ये लोकांची गरिबी दूर करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेचा भाग म्हणून सरकारी अधिकाऱ्यांकडून फोटो हटविण्याचा प्रचार सुरू आहे.
जियांग्शी प्रांतातील घटना
चीनच्या जियांग्शी प्रांतातील युगान काउंटीत ख्रिश्चनांची संख्या मोठी आहे. या प्रांतात गरिबांची संख्या जास्त आहे. १० लाख नागरिकांमध्ये ११ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात.
ख्रिश्चन समाजाची कुचंबणा
हाँगकाँगच्या 'साउथ चायना मॉर्निँग पोस्ट' दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार ख्रिश्चन समाजाच्या अनेक लोकांना येशू ख्रिस्तांचा फोटो आणि क्रॉस हटवावा लागला आहे.