Turkey Earthquake 2023 Update : तुर्की आणि सीरियातील (Turkey Syria Earthquake) भूकंपामधील मृतांचा आकडा 24 हजारावर पोहचला आहे. नुरदगी, कहमन मरस आणि गाजियनटेपमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. या  प्रलयकारी भूकंपाच्या ताडीतून अनेकजण आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत.  एक तरुण मृत्यूशी नडला आहे. स्वत:चं मूत्र पिऊन एक तरुण ढिगाऱ्याखाली तब्बल 94 तास जिवंत राहिला आहे. 94 तास मृत्यूशी झुंजणाऱ्या तरुणाचा संघर्ष अत्यंत धक्कादायक आहे (Turkey Earthquake 2023 Update). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भूकंपाच्या दुर्घटनेतून बचावलेल्या 17 वर्षांच्या मुलाने ढिगाऱ्या दबलेले असताना जिवंत राहण्यासाठी स्वतःचे मूत्र प्याले. झोपू लागू नये म्हणून दर 25 मिनिटांनी त्याच्या फोनचा अलार्म सेट केला होता. मात्र, दोन दिवसांनी फोनची बॅटरी संपली.


अदनान मुहम्मद कोरकुट असे या तरुणाचे नाव आहे. तो तुर्कस्तानच्या गझियानटेप शहरातील आहे. भूकंप झाला तेव्हा अदनान आपल्या कुटुंबासह घरी झोपला होता. भूकंपाचा धक्का बसला आणि क्षणातच तो ढिगाऱ्याखाली दबला गेला. एक तरुण तब्बल 94 तास ढिगाऱ्याखाली दबला होता. तो मदत मिळवा यासाठी प्रयत्न करत होता. बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहचेर्यंत त्याने जिवंत राहण्यासाठी स्वत:ची  लघवी पिण्यासोबतच शेजारी पडलेल्या झाडांची फुलेही चघळली. सोमर मृत्यू दिसत होता. मी ढिगाऱ्याखाली दबला जाईल अशी भिती सतत वाटत होती असं अदनानने सांगितले.


हृदय पिळवटून टाकणारा प्रकार


तुर्कस्तानमधील या प्रलयकारी भूकंपात इथली असंख्य घरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्या ढिगा-यांखालून अनेकांना बाहेर काढण्यात आले.  ढिगा-याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मृत व्यक्तीनं आपत्तीवेळी आपल्या लहानग्या मुलाला छातीशी घट्ट कवटाळून त्याला वाचवायचा प्रयत्न केला होता. त्याच अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. आश्चर्य म्हणजे त्याचा लहान मुलगा मात्र कित्येक तासांनंतरही सुखरुप होता. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले.


प्रलयकारी भूकंपामुळे तुर्की उद्धवस्त


सीरिया, सायप्रस, ग्रीस, लेबनॉन, जॉर्डन, इजिप्त आणि इस्त्राईलमध्येही धक्के जाणवले. या भूकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झालंय. दोन हजारांहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.  या भूकंपातील मृत्यूचा आकडा आणखी आठ पटीने वाढू शकतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.  


सततच्या भुकंपांमुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानीनं हादरलेल्या तुर्कस्तानला भारतानं मदत पाठवली आहे. भूकंपाने उद्ध्वस्त तुर्कीला वर्ल्ड़ बँक  1.78 बिलियन डॉलरची मदत देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. घरबांधणी, पायाभूत सुविधांच्या उभारणीसह मदतकार्यासाठीही निधी दिला जाणार आहे.