Most Spicy Food in World: आपल्यालाही मसालेदार पदार्थ खाण्याची हौस असते. खाण्यापिण्यात आपण अजिबातच कंजूषी करत नाही. खासकरून मस्तपैंकी कुठेतरी बाहेर जेवायला जायचे असेल तर आपण आवर्जून चांगल्या अशा महागड्या रेस्टोरंटमध्ये जातो आणि मस्तपैंकी आपल्याला आवडेल अशी स्पायसी डीश मागवतो. त्यातही मस्तपैंकी झणझणीतपणा हा असायलाच पाहिजे. महाराष्ट्रातही तिखट पदार्थांची काही कमी नाही. त्यामुळे आपल्याकडे ही खाद्यपरंपरा ही चांगली आहे. जगभरात ही परंपरा कायम आहे कारण आपल्यालाही आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो की काहीतरी स्पायसी खावेसे वाटतेच. त्यामुळे बाहेर आपण कुठे फिरायला गेलो तर आपल्यालाही त्याबाबतीत काहीतरी भन्नाट ऑप्शन्सही शोधत असतो. परंतु तुम्हाला माहितीये का की जगात सर्वात स्पायसी फूड कुठे मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसालेदार पदार्थ हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे असतात. त्यामुळे आपल्यासाठी असं पदार्थ कोणी खाणार नाही असं होणारच नाही. फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये तिखट चविष्ठ पदार्थ हे खाल्ले जातात. तेव्हा जाणून घेऊया की सर्वात स्पासी फूड कोणत्या देशात आहे. अनेक ठिकाणी स्पायसी पदार्थांसोबतच तळलेले आणि तूपकट पदार्थंही खाल्ले जातात. त्यामुळे अनेक देशांमध्ये नाना तऱ्हेचे पदार्थ बनलेही जातात. त्यातही वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. भारतात मसालेदार पदार्थांमध्येही अनेक विविधता आढळून येतात. त्यातून ताव मारण्यासाठी नॉनव्हेज हा एक उत्तम पर्याय असतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया तुम्हाला असे ऑप्शन्स नक्की कुठे आणि कसे मिळू शकतात. या खाली लज्जतदार पदार्थांबद्दलही जाणून घेऊया. 


मिरची, मीठ, आलं, लसूण, काळीमिरी, वेलची या मसाल्यांनी आपल्या पदार्थांना एक वेगळीच चव मिळते. त्यातून आमटी, भात, भाज्या, सूप, फ्राईड फूड, जंक फूड अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये आपल्याला फार वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. आता जाणून घेऊया या काही देशांबद्दल. मेक्सिकन फूडही चांगलेच स्पायसी असते. यात पाब्लोअन, हैबानेरो, एंचो, एलपीनो, सेरानो मिर्च असे नाना तऱ्हेचे मसाले असतात. त्यामुळे मेस्किसन पदार्थांना एक वेगळीच चव मिळते. त्यामुळे या पदार्थांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 


कोरियन जेवणही बऱ्यापैंकी स्पायसी असते. येथे चिकन बुलडक किंवा चिकन फायरही म्हटलं जातं. ज्याचे आनंद घेतला जातो. मलेशिया येथील ओटक नावाची एक डिश मिळते. ज्यात मासे, सूकेलली मिर्च, केळ्याची पानंही असतात. भारताचेही नावं या लिस्टमध्ये येते.