नवी दिल्ली: देशात स्वातंत्र दिन साजरा करण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. जागोजागी जय्यत तयारी सुरू आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्याला एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ आहे इराणी मुलीचा. इराणी मुलीला भारताचा राष्ट्रगीताची भुरळ पडली आहे. या मुलीनं संतूरवर राष्ट्रगीताची धून वाजवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या पूर्वसंध्येला इराणी मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रगीत म्हणजे आपली शान आणि त्याची धून ही नेहमीच आपल्याला एक ऊर्जा देते. प्रेरणा देते आणि ही धून इराणी मुलीनं संतूरवर वाजवली आहे. या मुलीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. 


एवढ्या लहान वयात इतक्या सुंदर पद्धतीने तिने सादर केलेलं हे राष्ट्रगीत पाहून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. नुकताच तिची जगातील टॉप -15 म्युझिक प्रोडिजीज अर्थात संगीत जगातील टॉप -15 उदयोन्मुख मुलांमध्ये निवड करण्यात आली आहे.




या मुलीचं नाव तारा आहे. वयाच्या 5 व्या वर्षांपासून तिची आई तिला संतूर वादनाचे धडे देत होती. तेव्हापासून संतुर वादन हा तिचा छंद आणि पुढे त्यामध्ये करियर करण्याची इच्छा निर्माण झाली. सुरुवातीला ती इराणी पारंपरिक वाद्य तोनबक वाजवत होती. त्यानंतर ती संतुरकडे वाळली. ग्लोबल चाइल्ड प्रोडिजीज अवार्डने 2020मध्ये तिचा सन्मान देखील करण्यात आला आहे.