नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लद्दाखमध्ये तणाव वाढला आहे. चीनचे अध्यक्ष सतत भारतीय भागात त्याच्या विस्तारावर भर देत आहेत. दरम्यान, चीनने लद्दाख सीमेवर पेट्रोलिंग वाढवल्याची बातमी आहे. पॅनोंग त्सो तलावाजवळ चीनने अधिक नौका उतरवल्या आहेत. यासह चीनने इथं पेट्रोलिंगही वाढवलं आहे. चीन पेइचिंग लद्दाख मधील भारताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिनी हेलिकॉप्टर देखील या विवादित सीमेजवळ पाहिले गेले. चीन बीजिंगच्या सीमेवर खूप आक्रमक होत आहे. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी करत भारतावर सीमा उल्लंघनाचा आरोप केला आहे.


चीनने म्हटलं की, 'चीनच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी भारतीय सैन्याने चीन-भारत पश्चिम विभाग आणि सिक्किम विभागाची सीमा ओलांडली.' भारताने त्वरित सैन्य मागे घ्यावे आणि आहे त्या स्थितीत रहावे. आधीही अनेकवेळा भारताने सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनकडून केला गेला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराकडून सीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे. सध्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झालेल्या चकमकींबद्दल माहिती मिळालेली नाही, परंतु अद्याप सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे.