मुंबई : वारंवार खुरापती करणाऱ्या पाकिस्तानने आजवर जगापासून लपवलेली आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ७ सप्टेंबर म्हणजेच पाकिस्तानच्या वायुदल दिवसाच्या निमित्ताने एका स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. २७ फेब्रुवारीला भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी वैमानिकांसाठी हे स्मारक उभारण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून उभारण्यात आलेल्या या स्मारकात एकाही सैनिकाचं नाव लिहिण्यात आलेलं नाही. पण, AMRAAM Missile ने सुखोईवर हल्ला करण्याची बाब मात्र यात नमूद करण्यात आली आहे. ज्यावर भारताकडून हरकत दर्शवण्यात आली आहे. पाकिस्तानकडून उभारण्य़ात आलेलं २७ फेब्रुवारीचं हे स्मारक एक खोटी चाल असल्याची ठाम भूमिका भारताकडून मांडण्यात आली आहे. 


अजाणतेपणी दिली कबुली 


स्क्वॉड्रन लीडर अभिनंदन यांनी एफ १६ विमान पाडल्याची कबुली पाकिस्तानने दिली. पाकिस्तानने शहीद वैमानिकांचं एक स्मृतीस्थळ उभारलं. त्यात पाकिस्तानने अजाणतेपणी एफ १६ भारताने पाडल्याचं कबूल केलं. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी पूंछ भागात एफ १६ विमानांद्वारे भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या विमानांचा भारताच्या वैमानिकांनी हवेतल्या युद्धात रोखलं. त्यात अभिनंदन यांनी मिग २१ विमानाद्वारे पाकिस्तानचं एफ १६ पाडलं होतं.


स्मारकातील खोटा दावा... 


AMRAAM Missileने सुखोई उध्वस्त केल्याची बाब या स्मारकात लिहिण्यात आली आहे. याच लिहिण्यात आल्यानुसार, सुखोई 30MKI ला PAF F-16 उडवणाऱ्या स्क्वाड्रन लीडर हसन महमूद सिद्दीकीने AMRAAM Missile चा वापर करत पाडण्यात आलं होतं.