मुंबई : भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) च्या हत्येबाबत तालिबानने म्हटलं आहे की, यामध्ये आमचा हात नाही. त्यांना माहित नाही की? भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीची हत्या कशी झाली? तालिबान संघटनेने पुलित्जर पुरस्कार विजेता पत्रकार दानिश सिद्दीकीच्या हत्येवर खेद व्यक्त केला आहे. (India condemns Danish Siddiquis killing; Taliban give body to Red Cross) तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिर (Zabiullah Mujahid) यांनी माहिती दिली की,'फायरिंगमुळे पत्रकाराची हत्या झाली का? याबाबत आम्हाला माहिती नाही. पत्रकाराची हत्या कशी झाली? याबाबत आम्हाला माहित नाही.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबान प्रवक्ताने म्हटलं,'युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराने आम्हाला सुचित करायला हवं. आम्ही त्या व्यक्तीची विशेष काळजी घेऊ.' पुढे ते म्हणाले,'भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीच्या निधनाचं आम्हालाही दुःख आहे. आम्हाला खेद आहे की,पत्रकार आम्हाला सुचित न करता युद्ध क्षेत्रात प्रवेश केला.'



रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची शुक्रवारी हत्या झाली. पाकिस्तानजवळ एका बॉर्डर क्रॉसिंगवर अफगाण सुरक्षा दल आणि तालिबान मुलांमध्ये वाद झाला. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समिती (ICRC) ला सोपवण्यात आलं.