कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून नेपाळ सैन्याला १० व्हेंटिलेटर भेट
भारताकडून दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ लष्कराला भेट...
काठमांडू : भारतीय सेनेने (Indian Army) कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लढण्यासाठी, रविवारी दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ (Nepal) लष्कराला भेट दिली. नेपाळ लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी नेपाळी आर्मीचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ सुकर्तिमाया राष्ट्रदीप जनरल पूर्ण चंद्रा थापा यांच्याकडे व्हेंटिलेटर हँडओव्हर केले.
हे व्हेंटिलेटर अनेक नवीन वैशिष्ट्यांसह डिझाइन केले गेले आहेत. ज्यात प्रगत, एडवांस्ड इनवेसिव, नॉन-इनवेसिव रेस्पिरेटरी सपोर्ट सिस्टम यंत्रणेचा समावेश आहे. याचा वापर आयसीयू, मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात केला जाऊ शकतो. हे व्हेंटिलेटर पोर्टेबल असून गरज पडल्यास, रुग्णाला सहजपणे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवलं जाऊ शकतं.
हे व्हेंटिलेटर देणं म्हणजे दोन सैन्यांत सुरु असलेल्या मानवतावादी सहकार्याचा एक भाग आहे. राजदूत क्वात्र यांनी व्हेंटिलेटर हँडओव्हर करताना कोरोना संकटाच्या वेळी नेपाळच्या लोकांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचंही सांगितलं आहे.