आयात शुल्कावरुन अमेरिकेला भारताचं सडेतोड उत्तर
भारताचा अमेरिकेला दणका
नवी दिल्ली : अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर लादलेल्या आयात शुल्काला भारतानंही सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या २९ वस्तूंवरील आयात शुल्कात तब्बल चार पट वाढ करण्यात आली आहे. अमेरिकतून आयात होणाऱ्या अक्रोड, सफरचंद आणि डाळींवरील आयात शुल्क यापुढे ३०% वरुन थेट १२०% करण्यात आलंय. ट्रम्प प्रशासानं भारतातून आयात होणाऱ्या पोलादावरील आयात शुल्कात २५% तर अॅल्युमिनिअमवरील आयात शुल्कात १०% वाढ लागू केली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारताला दरवर्षी साधारण १६५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. यापार्श्वभूमीवर भारतानं जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकतून आयात होणाऱ्या ३० वस्तूंची यादी गेल्या आठवड्यात पाठवली होती. या सर्व वस्तूंवरील आयात शुल्क ५०% वाढण्यात येऊ शकतं असं भारतानं या यादीद्वारे संघटनेला सांगितलं होतं.
वित्त मंत्रालयाने वटाणे, चणे, मसूरवर आयात कर 70 टक्के वाढवलं आहे. आधी ते 30 टक्के होतं. दाळीवर आयात कर 30 टक्क्यांहून 40 टक्के करण्यात आला आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या बदामावर 100 रुपयांऐवजी 120 रुपये प्रति किलोने कर आकारला जाणार आहे.