नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पशुपतीनाथाचे दर्शन घेतले. यावेळी नेपाळ भारत मैत्री पशुपती धर्मशाला या ४०० खाटांच्या धर्मशाळेचे उद्घाटन मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या हस्ते करण्यात आले. 


या इमारतीसाठी भारताने नेपाळला १४ कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य केले आहे. या तीन मजली इमारतीमध्ये कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था, मुदपाकखाना, भोजनकक्ष, वाचनालय, सभागृह अशा अनेक सोयीसुविधा आहेत. धर्मशाळेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी पशुपतीनाथाचे दर्शन घेतले. दरम्यान, दौरा संपवून मायदेशी परतण्यापूर्वी दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी बिहारमधील रक्सूल ते काठमांडू रेल्वे मार्गाबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.