`भारतात अडीच महिन्यांचा लॉकडाऊन आवश्यक, नाहीतर अनर्थ ओढावेल`
लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत तुम्ही सापडू शकता. ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असू शकते.
नवी दिल्ली: भारताने इतक्यात लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास भारत किमान १० आठवडे लॉकडाऊन राहायला हवा. लॉकडाऊन उठवण्याची घाई केल्यास मोठा अनर्थ ओढावू शकतो, असा इशारा जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नल ‘द लान्सेट’चे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी दिला आहे.
३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...
रिचर्ड हॉर्टन यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, भारताने कृपया घाई करू नये. लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत तुम्ही सापडू शकता. ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असू शकते. त्यामुळे आतापर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये केलेले प्रयत्न वाया जातील. त्यामुळे किमान १० आठवडे लॉकडाऊन पाळाच, असा सल्ला हॉर्टन यांनी भारताला दिला आहे.
'३ मे नंतरही आतासारखाच लॉकडाऊन राहिल्यास परिणाम भयावह असतील'
कोरोना व्हायरस १० आठवड्यांनंतर पसरणार नाही. कारण तोपर्यंत फारच कमी जणांमध्ये तेव्हा संसर्ग कायम असेल. भारतात जर लॉकडाऊन यशस्वी झाले तर आपल्याला १० आठवड्यांच्या कालावधीत कोरोनाच्या प्रादुर्भावात घट दिसून येईल. यानंतरच्या काळात परिस्थिती सामान्य झाली तरी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या इतर निकषांचे पालन करावे लागेल, असेही हॉर्टन यांनी सांगितले.