स्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशांची माहिती मिळणार
स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती मिळणं आता सरकारला शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती मिळणं आता सरकारला शक्य होणार आहे. भारतासह अन्य 40 देशांना स्विस बँकांमधल्या खात्यांची माहिती देण्यास स्वित्झर्लंडच्या सरकारनं मान्यता दिलीये.
करांबाबत माहितीची आदानप्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेला AEOI हा जागतिक करार स्वित्झर्लंडनं स्वीकारलाय. मात्र ही माहिती लगेच मिळणार नाहीये. तर 2019 सालापासून मिळायला सुरूवात होईल. तसंच मिळालेल्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा याची जबाबदारीही भारत सरकारवर असणार आहे.