Who is vivek ramaswamy ? एखाद्या नोकरीची (job news) जाहिरात इतक्या कमाल पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचते की, नोकरी करेन तर हीच असंच अनेकजण म्हणतात. कारण, त्या नोकरीत पगार, सुट्ट्या आणि इतर सुविधांची अक्षरश: बरसातच होत असते. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? इथं नाही म्हणण्याचं धाडसच करू नका, कारण या नोकरीतून इच्छुकांना गडगंज पगार, कमालीच्या सुविधा आणि नाही म्हटलं तरी जगभर फिरण्याची संधीही मिळणार आहे. कारण ही नोकरी देणारी व्यक्तीही काही साधीसुधी नाही. ही नोकरी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विवेक रामस्वामी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक रामस्वामी यांच्या कुटुंहबाच्या वतीनं एका नॅनीसाठी नोकरीची जाहिरात देण्यात आली आहे. आता नॅनी म्हटलं तिथंच तुम्हाला नोकरीचं स्वरुप साधारण लक्षात आलं असेल. जिथं लहान मुलांचा सांभाळ करणं अपेक्षित असेल. या कामासाठी साधारण किती पगार दिला जाऊ शकतो? अंदाजे 20 ते 30 हजार रुपये. पण, रामस्वामी त्यांच्या इथं रुजू होणाऱ्या नॅनीला इतका पगार देणार आहेत की ती श्रीमंत होणार यात वाद नाही. 


कोण आहेत विवेक रामस्वामी? 


अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील संभाव्य उमेदवार असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या विवेक रामस्वामी यांनी अमेरिकास्थित EstateJobs.com या एजन्सीच्या माध्यमातून नॅनीसाठीची एक जाहिरात दिली आहे. 'लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी एक नॅनी हवी आहे. या नोकरीसाठी  1,00,000 डॉलर (83 लाख रुपये) इतका पगार दिला जाणार आहे', असं जाहिरातीत स्पष्ट करण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा : इंद्रीच नव्हे, 'या' भारतीय बनावटीच्या व्हिस्कीही आहेत जगात भारी 


 


नोकरी आहे की लॉटरी? 


नोकरीसाठीच्या या जाहिरातीतून इच्छुकांना एका उच्चभ्रू कुटुंबासमवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. शिवाय लाखोंचा पगार या नोकरीतील लक्षवेधी बाब ठरतच आहे. याशिवाय या नोकरीमध्ये इतरही अनेक सुविधांचा समावेश आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 21 वर्षे असावं. नोकरीवर रुजू होणाऱ्या नॅनीला रामस्वामी कुटुंबासमवेत जगभरात फिरण्याची संधी मिळणार आहे. 


रामस्वामी यांच्या घरी नॅनी म्हणून रुजू होणाऱ्या व्यक्तीला दर आठवड्याला या कुटुंबासमवेत खासगी विमानानं विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळणार आहे. सध्या या कुटुंबासाठी खासगी आचारी, हाऊसहेल्प, खासगी सुरक्षेसाठी विविध व्यक्ती सेवेत असून, फक्त नॅनीच्याच शोधात असणाऱ्या या कुटुंबाचा हा शोध आता थांबणार हे जाहिरात पाहूनच लक्षात येत आहे.