मुंबई : देशात सध्या कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या बाजूने प्रयत्न करीत आहे. केंद्र ते राज्य सरकार कडक निर्णय घेत आहेत, तर भारतीय सैन्य प्रत्येक आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लष्कर प्रमुख एम.एम.नरवणे यांनी म्हटलं की, 'सैन्य गरज पडल्यास कोणतेही पाऊल उचलण्यास तयार आहे. लष्कराची '६ हवर' योजना तयार आहे, त्याअंतर्गत त्वरीत आयसोलेशन सेंटर आणि आईसीयू तयार करता येईल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत लष्करप्रमुखांनी कोरोना विषाणूच्या आव्हानांवर चर्चा केली. लष्करप्रमुख नरवणे यांच्या माहितीनुसार, संकटाच्या या वेळीही लष्कर आपले काम करीत आहे आणि सध्या सर्व कामकाज कामे सुरु आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी या संकटाला तोंड देण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे. ज्यावर सैन्य प्रमुख म्हणाले की, भारतीय सैन्य देशातील जनतेसाठी आहे, जर गरज निर्माण झाली आणि सरकारने सांगितले तर सैन्य पूर्णपणे तयार आहे.'


लष्कर प्रमुखांनी म्हटलं की, कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत, अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवेची आवश्यकता आणखी वाढू शकते. भारतीय लष्कराच्या सर्व सैनिकांना कोरोना विषाणूची माहिती देण्यात आली आहे आणि कोणालाही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.


लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी म्हटलं की, लष्कराची कोरोनाशी विविध स्तरांवर सामना करण्याची तयारी करत आहे. यामध्ये सर्विलंस आणि आयसोलेशची प्रोड़क्टीविटी वाढवणे, वेगवेगळ्या तळांवर सैन्याच्या रूग्णालयात 45 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करणे आणि 10 बेडचा आयसीयू वॉर्ड तयार करणे. ही सुविधा केवळ 6 तासांच्या सूचनेनंतर तयार केली जाऊ शकते.


सैन्यप्रमुखांनी म्हटलं की, 'पुढे कोणत्या प्रकारची परिस्थिती येईल हे सांगणे फार कठीण आहे, परंतु सैन्य आणि देश कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहेत. यामुळे गेल्या 2-3 महिन्यांत सैन्यात विविध स्तरावर प्रशिक्षणही दिले जात आहे. दररोज त्याचा आढावाही घेत आहे. पुढचा आठवडा भारतात महत्त्वपूर्ण आहे.'