भारतीय तरूण चिनी तरूणीसोबत अडकला लग्नबंधनात, लग्नाची एकच चर्चा
Indian Boy Chinese Girl Love Marriage:अनोख्या लग्नबंधनात अडकलेल्या कपलमधील भारतीय मुलाचे (Indian Boy) नाव अवी आहे. अवी हा हरियाणा राज्यातील रहिवासी आहे. तर सँडी ही चीनची(Chinese Girl) राजधानी बीजिंगची रहिवासी आहे. ऑगस्ट 2011 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती.
Indian Boy Chinese Girl Love Marriage: देशभरात लग्नाचा माहोल सुरु आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात (Marriage)अडकतायत. जागोजागी ढोल नगाडे वाजतायत. लग्नाच्या वराती निघतायत. अशा सर्वदूर घटना घडत आहेत. त्यात आता लग्नाच्या काही अनोख्या लव्ह स्टोरी (Love Story) समोर येत आहेत. अशीच एक लव्ह स्टोरी समोर आली आहे. या लव्हस्टोरीत भारतीय तरूण (Indian Boy) आणि चिनी तरूणी (Chinese Girl) लग्नबंधनात अडकले आहेत. या त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अशी झाली भेट
अनोख्या लग्नबंधनात अडकलेल्या कपलमधील भारतीय मुलाचे (Indian Boy) नाव अवी आहे. अवी हा हरियाणा राज्यातील रहिवासी आहे. तर सँडी ही चीनची(Chinese Girl) राजधानी बीजिंगची रहिवासी आहे. ऑगस्ट 2011 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती. अविने हरियाणातील शहरात शालेय शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे दोन वर्षे नोएडा येथे नोकरी केली. त्यानंतर एमबीए करण्यासाठी तो पॅरिसला गेलो. जिथे त्याची भेट सँडीशी झाली. दोघे एकाच विद्यापीठातून शिकत होतो.
अवि खूप कम्फर्टेबल वाटत होता. तो अनोळखी व्यक्तीसारखा वाटलाच नाही, असे सँडी त्यांच्या पहिल्या भेटीबाबत म्हणते. तर मला सँडी खूप क्यूट वाटली. मला तिचे डोळे आणि हसणे खूप आवडले होते, असे अवी म्हणाला होता. पहिल्या भेटीनंतर दोघेही फिरायला गेले. त्यानंतर मेसेजिंग सुरु झाली. त्यानंतर पुन्हा दोघेही कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये भेटले. या पार्टीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर ते एका डेटवर गेले, जिथे अवीन सॅडीला प्रपोज केले. 'तू माझी प्रेयसी होशील का', असे प्रपोजल त्याने सॅंडी समोर ठेवले, आणि सँडीने देखील त्याला होकार कळवला.
5 वर्ष डेट केलं
रिलेशनशिपमध्ये (Relationship) आल्यानंतर दोघांनी एकमेकांना 5 वर्ष लॉंग डिस्टेन्समध्ये डेट केलं. त्यानंतर 2018 मध्ये सॅंडी पहिल्यांदा भारतात आली होती. यादरम्यान अवीने सँडीशी सरप्राईज पद्धतीने एंगेजमेंट केली. सँडीला एंगेजमेंटची काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर दोघांनीही त्याच वर्षी कोपनहेगनमध्ये लग्न केले. या लग्नाला दोन्ही बाजूचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
आता लग्नानंतर सँडीने स्वत:ला भारतीय संस्कृतीत रमून घेतले आहे. ती भारतीय पेहराव करते आहे. त्याचसोबत एका व्हिडिओमध्ये ती करवाचौथ सेलिब्रेट करताना दिसली होती. तर दूसरीकडे अवी देखील चीनचे सण साजरे करताना दिसला.
अवी आणि सँडी यांनी त्यांची संपूर्ण लव्ह स्टोरी (Love Story) यूट्यूब चॅनलवर सांगितली आहे. तसेच ते त्याचे लव लाईफचे किस्से सोशल मीडियावर शेअऱ करत असते. या जोड्प्याची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.