मुंबई : १४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. याचदिवशी पाकिस्तानमधल्या तब्बल ५०० हून अधिक वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आहे. यामध्ये पाकिस्तान सरकारच्या वेबसाईटचाही समावेश आहे. हॅक झालेल्या या वेबसाईटवर भारताच्या समर्थनार्थ लिखाण करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅक झालेल्या या वेबसाईटमध्ये पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, पाणी आणि वीज मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचा समावेश आहे. यातल्या काही वेबसाईट अजूनही बंद आहेत. या वेबसाईटवर लूलूसेक इंडिया नावाच्या हॅकर्सनं हल्ला केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे.


पाकिस्तानी वेबसाईट हॅक करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ३ ऑगस्टला पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. या वेबसाईटवर तिरंग्यासोबत जन-गण-मन लिहिण्यात आलं होतं. तसंच या वेबसाईटवर हॅपी इंडिपेंडन्स डे असंही लिहिलं गेलं होतं. याचबरोबर तिरंग्यासोबत असलेल्या अशोकचक्रावर महात्मा गांधी आणि भगतसिंग यांचा फोटोही लावण्यात आला होता.


ऑक्टोबर २०१६मध्येही पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करून त्यातला महत्त्वाचा डेटा लॉक करण्यात आला होता. वेबसाईटवरचा हा हल्ला भारतातून झाल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता.