लंडन: चॅनल ४ वर प्रसारीत होणाऱ्या 'चाईल्ड जिनियस' च्या पहिल्या सिजनमध्ये भारतीय वंशाच्या मुलाने मोठी कामगिरी केली आहे. या मुलाचे नाव राहुल असून त्याने विचारलेल्या १४ प्रश्नांची अगदी सहज उत्तरे दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर संपूर्ण देशात राहुल चर्चेचा विषय ठरला. रिपोर्ट्सनुसार राहुलचा आयक्यू १६२ आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा राहुलचा आयक्यू अधिक असल्याचे बोलले जात आहे. जगभरातील उत्तम आयक्यू असलेल्या लोकांचा जो क्लब आहे, त्याचा सदस्य होण्याची पात्रता राहुलमध्ये आहे. परंतु, त्याच्या आयक्यूची कोणतीही वैज्ञानिक तपासणी न झाल्याने हा एक केवळ अंदाज आहे. 


चॅनल ४ वर प्रसारीत होणाऱ्या या कार्यक्रमात ८-१२ वर्षांच्या २० मुलांनी सहभाग घेतला. त्यातील सहभागी स्पर्धक प्रत्येक आठवड्याला हळूहळू स्पर्धेबाहेर जातील. राहुलने १५ पैकी १४ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. परंतु, शेवटच्या प्रश्नासाठी त्याच्याकडे वेळ उरला नाही.


राहुलने सांगितले की, "मी नेहमी काहीतरी श्रेष्ठ करण्याची इच्छा ठेवतो आणि ते मी कोणत्याही किंमतीत करतो. मला माहीत आहे की, मी जिनियस आहे. माझे मेटल मॅथ्स, सामान्य ज्ञान उत्तम असून कोणतीही गोष्ट शिकणे माझ्यासाठी सोपे आहे." त्यानंतर त्याने सांगितले की, लॅटिन ही माझी आवडीची भाषा आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या सिजनमध्ये उत्तम कामगिरी केल्याने तो सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला.


एका ट्विटर युजरने त्याच्याविषयी लिहिताना असे म्हटले आहे की, 'राहुल उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो.'