स्टॉकहोम : भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळवारी स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा मोठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अभिजीत भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसले. त्यामुळे जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. नोबेल पुरस्कार स्विकारताना अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी यांच्या भारतीय पेहरावाने लक्ष वेधून घेतले. गेली कित्येक वर्ष परदेशात स्थायिक होऊनही भारताशी आपल नाते घट्ट ठेवण्याचे, जमिनीवर राहण्याचे संस्कार यानिमित्ताने लाखो भारतीयांना पाहायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी संशोधक अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. स्वीडनचे राजा कार्ल गुस्ताफ यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला. एस्थेर डफ्लो आणि मायकेल क्रेमर यांना देखील हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. आल्फ्रेड नोबेल यांच स्मरण म्हणून १० डिसेंबरला त्यांचा पुण्यतिथी ला नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात.


आईकडून कौतुकाची थाप


माझ्या मुलांन आयुष्यभर हेच केले आहे. अभ्यास अर्थशास्त्र हेच त्याचं विश्व होते, त्यामुळे हा पुरस्कार मिळाला, अशी कौतुकाची पाठिवर थाप अभिजीत यांच्या आईने मारली. दरम्यान, कर्तृत्ववान असूनही जमिनी राहण्याची कसब त्यांच्या आईने दाखवून दिली आहे. अभ्यास अर्थशास्त्र हेच त्याचं विश्व होते, त्यामुळे त्याने फार काही विशेष केले, अस मला वाटत नाही.