भारतीय वंशाच्या खासदाराचा भारतीय वंशाचे पंतप्रधानपदाचे दावेदार ऋषी सुनक यांना विरोध
ब्रिटनमध्ये नव्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून काम केलेल्या भारतीय वंशाच्या प्रिती पटेल (Priti patel) यांनी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या ऐवजी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या वेळी देखील खासदार पटेल यांनी कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यात पंतप्रधानपदासाठी आपली निवड सांगितली नव्हती.
पटेल यांनी ट्विट केले की 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते जॉन्सन यांना जनादेश मिळाला. चांगले आणि मोठे निर्णय घेऊन त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. ते म्हणाले की बोरिस जॉन्सन यांना आमचा निवडणूक अजेंडा पूर्ण करण्याचा जनादेश आहे. मी जॉन्सन यांना पाठिंबा देते.
प्रिती पटेल यांच्या आधी वाणिज्य मंत्री जेकब रेसमॉग, संरक्षण मंत्री बेन वॉलेस आणि मंत्री सायमन क्लार्क यांनी जॉन्सन यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देणार असल्याचे उघडपणे सांगितले आहे.
लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा नव्या पंतप्रधानाचा शोध सुरू झाला आहे. टोरी पक्षात पंतप्रधानांबाबत मंथन सुरु आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डेंट यांच्या नावांचा विचार केला जात आहे. ब्रिटिश संसदेत एकूण 357 टोरी खासदार (कंझर्वेटिव्ह पक्षाचे खासदार) आहेत. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी 100 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिस जॉन्सनच्या समर्थकांची संख्या 46 वर पोहोचली आहे, परंतु सुनकच्या समर्थकांची संख्या 100 आहे, तर पेनीच्या समर्थकांची संख्या 21 झाली आहे. पंतप्रधानपदासाठी एकच उमेदवार पुढे आला तर पुढच्या आठवड्यापर्यंत ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळेल. दोन उमेदवारांमध्ये लढत झाल्यास शुक्रवारपर्यंत 1,70,000 टोरी सदस्य ऑनलाइन मतदान करतील. बोरिस जॉन्सन यांनी 2019 च्या निवडणुकीत टोरी पक्षाला 80 जागा जिंकून बहुमत मिळवून दिले होते.
ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. बोरिस हे देखील प्रबळ दावेदार मानले जात आहेत, परंतु त्यांनी ज्या कारणांसाठी राजीनामा दिला होता, ते विसरलेले नाहीत. एका घोटाळ्यात त्यांचं नाव आल्याने त्याची चौकशी अजून सुरु आहे.
ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री राहिलेले ऋषी सुनक यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. ते सुप्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई देखील आहेत, परंतु बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात त्यांची भूमिका आणि त्यांची अनेक विधाने सरकारमध्ये वादाचा विषय ठरली.
बोरिस जॉन्सन पंतप्रधान असताना त्यांच्या अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, त्यापैकी एक ऋषी सुनक यांचे नाव होते. अनेकांनी राजीनामे दिले, पण बोरिसच्या नजरेत ऋषी सुनक हेच त्यांची सत्ता गमावण्याचे प्रमुख कारण होते. यामुळे बोरिस यांच्यापुढे ऋषी सुनक सर्वात मोठे प्रतिस्पर्धी बनले आहेत.