इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या
Israel Palestine War: भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया.
Israel Palestine War: इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या सैन्याकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. तसेच इस्रायलकडून आता जमिनीवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत. दरम्यान भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया.
लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक शांतता रक्षक म्हणून तैनात करण्यात आल्याचेही वृत्त आहे. भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्रांचे सैनिक म्हणून शांतीसेनेसाठी तैनात करण्यात आले आहे.
इस्रायलसोबतचा लष्करी संघर्ष संपवण्यासाठी रशिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने म्हटले आहे. पॅलेस्टिनी ग्रुपचे बाह्य संबंध प्रमुख अली बराक यांनी माध्यमांशी बोलताना या आशयाचे विधान केले.
हमासचा रशिया आणि त्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे आम्ही संघर्ष सोडवण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीचे स्वागत करू, असे रशियन न्यूज एजन्सी टासने बराकच्या हवाल्याने म्हटले आहे.
काय म्हणाले हमास?
इस्रायलच्या बॉम्बहल्ला आणि गाझा पट्टीची केलेली नाकेबंदी यामुळे नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर संपवण्यात आम्हाला रस असल्याचे हमासने म्हटले आहे. गटाचे नेतृत्व मॉस्कोशी सतत संपर्कात असल्याचे हमासच्या अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही एका अरब देशामध्ये रशियन मुत्सद्द्यांसोबत संभाव्य बैठकीसाठी तयार आहोत आणि आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.
खरं तर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले की रशिया पॅलेस्टिनी-इस्रायल करारामध्ये मदत करू शकतो कारण त्याचे संघर्षाच्या दोन्ही बाजूंशी संबंध आहेत.अतिरेकी गटाने पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेचे खूप कौतुक केले आहे. आम्ही रशियन नेत्याच्या विधानांचे अनुसरण करतो ज्यामध्ये ते प्रादेशिक विकासाचे मूल्यांकन करतात, असे ते म्हणातात. फिलिस्तानींनी त्यांच्या बचावासाठी रशियाचा आवाज आणि आक्रमकता थांबवावी, गाझा पट्टीवरील नाकेबंदी उठवण्यासाठी आणि मानवतावादी मदत वितरण पुन्हा सुरू करणे अशा मॉस्कोच्या महत्वाचा मागण्या आहेत,असे बराक यांनी म्हटले आहे.