मुंबई : 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकासह काही इंग्रजी दैनिकांनी ही बातमी पहिल्या पानावर छापली आहे. दोन देशांच्या संबंधांमधील अंतर वाढत चालल्याने त्याचा परिणाम नोकऱ्यांवर देखील होवू शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. मालदीव या देशात एका हॉटेलशी संबंधित असलेल्या कंपनीच्या जाहिरातीत स्पष्ट लिहिण्यात आलं आहे की, भारतीयांनी नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज नाही. एखाद्या देशाच्या नावाने असं लिहिणं धक्कादायक आहे, जगभरात भारताचे सलोख्याचे संबंध असताना, जाहिरातीत भारतीयांनी नोकरीसाठी अर्ज करू नये असं लिहिण्यात आलं आहे.


'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाने ही बातमी पहिल्या पानावर छापली आहे. मालदीवमध्ये भारतीयांच्या नोकरीवर भारत-मालदीव संबंधांचे परिणाम झाले आहेत. द हिंदू दैनिकाने आपल्या बातमीत लिहिलं आहे, भारतीयांनी नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज नाही, कारण त्यांना या देशात काम करण्याचं परमिट नाही. भारतीयांना मालदीवमध्ये काम करण्याचं परमिट नसल्याने, भारतीयांना मालदीवमध्ये नोकरी करता येणार नाही, हे स्पष्ट आहे.