Mass shooting : अमेरिकेत ( America) पुन्हा एका अंधाधुंद गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (california) शनिवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे या घटनेत आणखी लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चिनी नववर्षाचे (China New Year) स्वागत करण्यासाठी मोन्टेरे पार्क येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला. गोळीबारानंतर एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी धावपळ सुरु केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री 10 नंतर हा सर्व प्रकार घडला आहे. लॉस एंजेलिस टाईम्सच्या वृत्तानुसार, मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या स्वागता दरम्यानच हा गोळीबार झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे हजारो लोक उत्सवासाठी जमले होते. हे पार्क लॉस एंजेलिस डाउनटाउनपासून सुमारे 11 किमी अंतरावर आहे. दरम्यान सध्या मृतांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसली तर 10 लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.



दरम्यान, ज्या गल्लीत हा गोळीबार झाला तिथे असलेल्या रेस्टॉरंटचे मालक सुंग वोन चोई यांनी याबाबत माहिती दिली आहे. चोई यांनी सांगितले की, "तीन तरुण माझ्या दुकानात धावत आले आणि त्यांना दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यांनी मला सांगितले की ज्याने गोळीबार केला त्याच्याकडे मशीनगन होती. डान्स क्लबमध्ये ही घटना घडल्याचे वाटत आहे."


आठवड्याभरातील दुसरी घटना


5 दिवसांपूर्वीही सेंट्रल कॅलिफोर्नियामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. कॅलिफोर्नियातील गोशेन येथील हार्वेस्ट रोडच्या 6800 ब्लॉकमध्ये ही घटना घडली होती. या अंदाधुंद गोळीबारात आई आणि मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला पोलिसांनी टार्गेट किलिंग असे म्हटले होते.