फुटबॉल मॅचदरम्यान मृत्यूचा थरार, हिंसेत 127 जण ठार
Indonesia Football Match Violence: इंडोनेशियात फुटबॉल मॅचदरम्यान मोठी हिंसा उसळली. या हिंसेत 127 जण ठार झालेत.
जकार्ता : Indonesia Football Match Violence: आता बातमी आहे खेळाची मैदानावरील हिंसेची. इंडोनेशियात फुटबॉल मॅचदरम्यान मोठी हिंसा उसळली. या हिंसेत 127 जण ठार झालेत. अरेमा FCआणि पर्येबाया सुरबाया या फुटबॉल क्लबमध्ये ही मॅच होत होती. या दरम्यान, अरेमा टीमचा पराभव निश्चित होणार होता. यावेळी अरेमाचे संतप्त समर्थक गोंधळ घालत मैदानात उतरले. यावेळी मैदानात मोठी हिंसा झाली. काही समर्थकांनी मैदानातील खेडाळूंवर हल्ला चढवला. दोन फुटबॉलसमर्थक एकमेकांना भिडल्यानं ही हिंसा उसळली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूच्या नळकांड्या फोडल्या. या हिसेंत 100 हून अधिक जण जखमी झालेत.
इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान 127 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका संघाने सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केल्याने हा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेने पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंटाच्या हवाल्याने सांगितले की, स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आणि बाकीचे रुग्णालयात मरण पावले.
फुटबॉल सामन्यात हिंसा का झाली?
पर्सबाया सुराबायाने इंडोनेशियातील अरेमा एफसीकडून फुटबॉल सामना 3-2 ने जिंकला. त्यानंतर अरेमा एफसीचे हजारो चाहते खेळाच्या मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरू केला. यानंतर स्थानिक पोलीस आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे सदस्य मैदानात दाखल झाले आणि पर्स्बाया सुराबायाच्या खेळाडूंना संरक्षण देण्यात आले.
सुरक्षा कर्मचारी आणि चाहत्यांमध्ये हाणामारी
खेळपट्टीवर सुरक्षा दल आणि चाहते यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. यादरम्यान चाहत्यांनी सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला.
पीटी लीगा इंडोनेशिया बारुचे (LIB) अध्यक्ष अखमद हादियान लुकिता यांनी इंडोनेशियातील या हिंसक घटनेवर सांगितले की, आम्ही या घटनेबद्दल खूप चिंतित आहोत आणि मनापासून खेद व्यक्त करतो. आम्ही आमचा शोक व्यक्त करतो आणि आशा करतो की हा आपल्या सर्वांसाठी एक धडा असेल.