Indonesia marapi volcano Video : जिवंत ज्वालामुखींचा उद्रेक अधूनमधून होत असतो. जगभरात असे काही जिवंत ज्वालामुखी आहेत जे कायमच अभ्यासर आणि संशोधकांसाठी एक कुतूहलाचा विषय ठरले आहेत. पण, यातीलच एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि पाहता थरकाप उडवणाऱ्या वास्तवानं संपूर्ण जग हादरलं. इंडोनेशियामध्ये असणाऱ्या मरापी ज्वालामुखीचा रविवारी, 3 डिसेंबर 2023 ला उद्रेक झाला. (indonesia marapi volcano erruption 11 climbers killed world news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानकच झालेल्या या उद्रेकामध्ये 11 गिर्यारोहकांचा मृत्यू ओढावला. त्या क्षणापासून समुद्रसपाटीपासून 9843 फूट उंचीवर असणाऱ्या या ज्वालामुखीतून सातत्यानं धुळ, राख आणि लाव्हारस बाहेर पडत असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून मिळाली आहे. 


ज्वालामुखीच्या उद्रेकाबाबतची माहिती मिळताच इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापन विभाग BNPB नं या ज्वालामुखीच्या नजीकच्या भागात न जाण्याचं आवाहन नागरिकांना देत सतर्कतेचा इशारा त्यांना देऊ केला. मरापी ज्वालामुखीचा उद्रेक इतका मोठा होता की, काही क्षणांतच जवळपासच्या भागांमध्ये राखेचे ढग दाटले, घरांवर, वृक्षांवर, वाहनांवर आणि रस्त्यांवर राख पसरली आणि अचानकच काळोख दाटून आला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत इथं ज्वालामुखीपासून तीन किलोमीट अंतरापर्यंत न जाण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला. शिवाय या भागांमध्ये आलेल्या पर्यटकांनासुद्धा सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन देण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : ऑक्टोबर नव्हे, आधी डिसेंबर होता 10 वा महिना; मग तो 12 व्या स्थानी कसा गेला?


 


आई...मला वाचव... 


इंडोनेशियामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर एकच हाहाकार माजला. निसर्गाचा हा कोप सुरु असतानाच जगभरात एका तरुणीच्या व्हिडीओनं अनेकांचाच थरकाप उडवला. BBC नं या तरुणीचा व्हिडीओ शेअर करत परिस्थितीची दाहकता जगासमोर आणली. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये 19 वर्षीय तरुणी राखेनं माखलेली दिसत असून, ती तिच्या आईला मदतीची आर्त हाक मारताना दिसत आहे. बीबीसीच्या माहितीनुसार ही तरुणी ज्वालामुखीच्या उद्रेकात सापडलेल्या गिर्यारोहकांच्याच गटातील असून, ती कशीबशी जीव वाचवू शकल्याचं पाहायला मिळालं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by BBC News (@bbcnews)



मरापी ज्वालामुखीचा उद्रेक इतका मोठा होता, की प्रशासनानं तातडीनं दुसऱ्या स्तरावरील सतर्कतेचा इशारा जारी करत स्थानिकांना मास्क वापरण्याचा इशारा दिला. शिवाय शहरांमध्ये पसरलेला विषारी वायू पाहता नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. 


का होतो ज्वालामुखीचा उद्रेक? 


जगात अनेक जिवंत ज्वालामुखी आजही अस्तित्वाक कसे आहेत? हा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास त्यामागं तीन महत्त्वाची कारणं आहेत. इंडोनेशिया जिथं आहे ते ठिकाण पृथ्वीच्या गर्भात असणाऱ्या यूरेशियन टेक्टोनिक प्लेटपाशी असून हा थर सध्या काहीसा दक्षिणेकडे सरकत आहे. तर, इंडियन-ऑस्ट्रेलियन टेक्टोनिक प्लेट उत्तरेला सरकतेय. फिलिपिन्स प्लेट पश्चिमेला सरकतेय त्यामुळं हे तिन्ही थर एकमेकांवर आदळल्यामुळं ज्वालामुखींचा उद्रेक होतो.