ऑक्टोबर नव्हे, आधी डिसेंबर होता 10 वा महिना; मग तो 12 व्या स्थानी कसा गेला?

December Interesting Facts : वर्षातील सर्वात अखेरचा म्हणजेच 12 वा महिना म्हणूनही डिसेंबर महिन्याचा उल्लेख होको. पण, तुम्हाला माहितीये हा महिना आधीपासून 12 व्या स्थानी नव्हता.   

Dec 04, 2023, 11:43 AM IST

December Interesting Facts : डिसेंबर महिना सुरु झाला की अनेकजण Best time of the year असं म्हणत या महिन्याचं स्वागत करतात. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होण्याचा हा महिना म्हणजे, डिसेंबर. 

 

1/7

year ender december 2023 interesting facts

महिन्यांचा क्रम, त्यांची नावं ठरवण्यामागेसुद्धा एक रंजक प्रवास आहे. काय आहे हा प्रवास? पाहूनच घ्या. 

2/7

एप्रिलपासून वर्षाची सुरुवात

year ender december 2023 interesting facts

आधी एका वर्षात फक्त 10 महिनेच असायचे. एप्रिलपासून हे वर्ष सुरु होऊन ते डिसेंबरवर थांबत होतं. पुढे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांना या यादीत स्थान देण्यात आलं.   

3/7

फब्रुआ

year ender december 2023 interesting facts

इसवी सनपूर्व 690 मध्ये पोम्पिलियसनं हिवाळा संपून मार्च महिना सुरु होण्यादरम्यानच्या काळात साजरा केल्या जाणाऱ्या सोहळ्याला 'फब्रुआ' असं नाव दिलं. तिथंच फेब्रुवारी हा महिना जन्माला आला.   

4/7

जानेवारी आला सर्वात शेवटी

year ender december 2023 interesting facts

जाणून आश्चर्य वाटेल, पण वर्षातला सर्वात पहिला म्हणजेच जानेवारी महिना दिनदर्शिकेत सर्वात शेवटी जोडण्यात आला होता. 

5/7

शेवट डिसेंबरनं

year ender december 2023 interesting facts

'जेनस' हा प्रारंभ आणि अंताचा देवता मानला जातो. त्यामुळं वर्षाच्या सुरुवातीला त्याला हे स्थान देत डिसेंबरनंतर पुन्हा जानेवारीपासून वर्षाची सुरुवात करण्यात आली.

6/7

वर्षाला निरोप

year ender december 2023 interesting facts

डिसेंबर महिन्यात आपण वर्षाला निरोप देतो आणि जानेवारी महिन्यात नव्या वर्षाचं स्वागत करतो. या महिन्याचं नाव लॅटिनमधील डेका शब्दावरून आला असून, त्याचा अर्थ होतो 'दहा'.   

7/7

आहे की नाही गंमत?

year ender december 2023 interesting facts

गतकाळात हा महिना वर्षाच्या शेवटी येत होता कारण त्यानंच वर्षअखेर होत होती आणि त्याचा नावानिशी अर्थही 'दहा' होत होता. आहे की नाही गंमत?