Millionaire After Meteor Crash: कुणाचं नशिब कधी फळफळेल काय सांगू शकत नाही. असाच अनुभव  इंडोनेशियातील एका व्यक्तीला आला आहे.  अवकाशातून एक रहस्यमयी वस्तू या व्यक्तीच्या घरावर पडली, रातोरात हा माणूस करोडपती बनला. या  रहस्यमयी वस्तुच्या विक्रितून या व्यक्तीला करोडो रुपये मिळाले आहेत. 


असं घडल तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोशुआ हुतागालुंग असे या व्यक्तीचे नाव आहे. जोशुआ इंडोनेशियातील कोलांगचा रहिवासी आहे. त्याच्या घरावर अंतराळातून एक दगड पडला होता. हा दगड म्हणजे उल्कापिंड आहे. एक तज्ञाने ही उल्का खरेदी करुन त्याच्या बदल्यात जोशुआ याला करोडो रुपये दिले आहेत. 


4.5 अब्ज वर्षे जुनी उल्का


जोशुआ घराबाहेर काम करत असताना आकाशातून मोठा दगड त्याच्या घरावर पडला. पृथ्वीच्या दिशेने ही उल्का इतक्या प्रचंड  वेगाने आली की 15 सेमी खड्डा तयार झाला. ही उल्का  4.5 अब्ज वर्षे जुनी असल्याचे तपासात आढळून आले आहे. उल्काच्या या तुकड्याचे वजन 2.1 किलो इतके आहे.  हे अत्यंत दुर्मिळ CM1/2 कार्बोनेशियस कॉन्ड्राईट म्हणून ओळखले जाते. ही विशेष प्रकारची उल्का आहे.


14 कोटी रुपयांना विक्री


2.1 किलो वजनाचा उल्काचा हा तुकडा तब्बल 14 कोटी रुपयांना विकला गेला. जोशुआ याला 30 वर्षांच्या पगाराएवढी किंमत या उल्काच्या विक्रीतुन मिळाली आहे.  हुतागालुंग येथील तज्ज्ञाने उल्काचा हा तुकडा संशोधनासाठी खरेदी केला. जोशुआ याच्या घराजवळ असा प्रकारच्या उल्काचे 3 तुकडे सापडले आहेत. 


बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाला यश


एकीकडे चांद्रयान-3च्या यशाची चर्चा सुरु असतानाच नासालाही एका अंतराळ मोहीमेत मोठं यश आलंय. बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळालंय. नासाच्या ऑसिरिस-रेक्स अवकाशयानातून पृथ्वीच्या कक्षेत 63 हजार मैलांवर हे नमुने सोडण्यात आले. सुमारे 250 ग्रॅमचे हे नमुने आहेत. उल्का, अंतराळातील वातावरण, सूर्यमाला यासंबंधीच्या संशोधनात उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 8 सप्टेंबर 2016 मध्ये ऑसिरिक्स-रेक्स अंतराळायानाचा प्रवास सुरु झाला होता. तब्बल 7 वर्षांनी अंतराळातून धूळ आणि दगडाचे नमुने या यानानं पृथ्वीवर पाठवलेत.