High Heels चा शोध महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी, यामागची कहाणी रंजक
हाय हिल्सची स्टाईल पुरुषांसाठी सुरू करण्यात आली होती.
मुंबई : महिलांना हाय हिल्स घालायला आवडतात. ज्यामुळे त्या आकर्षक तर दिसतातच, तसेच त्यांची प्रतिमा देखील समाजात उंचावते. त्यात एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, महिला हाय हिल्स घालून समाजात आपली प्रतिष्ठा दाखवतात. संशोधनात असेही म्हटले आहे की, हाय हिल्स घालणे म्हणजे हाय सोसायटीत वावरण्याची लक्षणे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, हाय हिल्स महिलांसाठी नसून त्या सुरूवातीला पुरुषांसाठी बनवल्या गेल्या होत्या.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हाय हिल्सची स्टाईल पुरुषांसाठी सुरू करण्यात आली होती. प्रथम टाचांचे शूज पुरुषांसाठी बनवले गेले होते, ज्याचा वापर ते युद्ध आणि घोडेस्वारी दरम्यान करत असत. अहवालानुसार, घोडेस्वारी करताना उंच टाचांचे शूज घातल्याने पकड मजबूत होते. म्हणूनच पुरुष शूजमध्ये टाच वापरत असत.
10 व्या शतकात उंच टाचांची ओळख झाली
त्याचा वापर प्रथम 10 व्या शतकात सुरू झाला. पर्शिया राज्याच्या पुरुषांनी प्रथमच हाय हिल्स घालण्यास सुरुवात केली. युद्धादरम्यान, या साम्राज्यातील लोकांना उंच टाचांचे बूट घालावे लागायचे. सुरक्षिततेच्या दृष्टीने उंच टाच जास्त मजबूत आणि उत्तम मानल्या जात होत्या.
1599 मध्ये पर्शियाचा राजा शाह अब्बास याने आपला राजदूत युरोपला पाठवला तेव्हा त्याच्यासोबत उंच टाचांचे बूट युरोपात पोहोचले होते. यानंतर जगभरात उंच टाचांच्या शूजचा ट्रेंड वाढला.
हळुहळू अनेक देशांमध्ये उंच टाचांचे बूट वापरले जाऊ लागले आणि ते परिधान करणे हा श्रेष्ठ आणि राजांचा छंद बनला. फ्रान्सचे शासक लुई चौदावा हे 10 इंच उंच टाचांच्या शूजचा वापर करायते, कारण त्यांची लांबी फक्त पाच फूट चार इंच होती.
यानंतर 1740 चा काळ आला, तेव्हा महिलांनी प्रथमच उंच टाच घालायला सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या 50 वर्षात पुरुषांनंतर हाय हिल्स हे फक्त महिलांचा आवडीचे बनले. कालांतराने त्याच्या आकारात आणि रचनेत बरेच बदल झाले आहेत.
हे लक्षात घ्या की, हाय हिल्समुळे तुम्ही आकार्षक दिसत असलात तरी, याचा वापर तुमच्या आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही, कारण याचा थेट परिणाम तुमचा मणका, गुडघे आणि टाचांवर होतो. जास्त वेळ हाय हिल्स घातल्याने सांधेदुखी होऊ शकते