Little Girl Trending Viral Video : सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्राम यावर प्रत्येक सेकंदाला एखादा व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेमी युगुलांचे व्हिडीओ, वधू वराचे लग्नातील व्हिडीओ असो प्राण्याचे किंवा एखाद्या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ इथे पाहिला मिळतात. पण सोशल मीडियावर एका चिमुरडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


मुले ही देवाघरची फुलेच!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काही तरी बोलतात किंवा करतात की आपण सगळे अवाक् होतो. यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी लहान, ना कुठला रंग ना कुठली जात...श्रीमंत काय आणि गरीब काय यांचासाठी सगळं एक सारखं असतं. 


अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडीओ 


अनेक वेळा आपण जेव्हा रस्त्याने जातो काही गरीब लोकं तिथे बसलेली दिसतात. ते आपल्याकडे पैशाची किंवा खाण्याची मदत मागत असतात. सिग्नलवर तर अशी अनेक मुलं, महिला आपल्याला दिसतात. ज्यांकडे पाहून दया येतं. पण काही जणांना पैशांचा एवढा माज असतो ना, की ते अशा लोकांना तुच्छ वागणूक देतात. (Instagram viral vide girl Seeing a sick old man sitting by the roadside helps drink water trending video on Social media)


चिमुरडीने जिंकलं मनं!


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेला आहे. त्याचा हात सतत थरथरतो. वयामानाने कदाचित त्याचा हातात पहिलेसारखी ताकद राहिली नाही. तिथेच असलेल्या एका लहान मुलीने हे दृश्य पाहिले. त्या आजोबांची पाणी पिण्यासाठी धडपडत तिने पाहिली. तेव्हा तिने आजोबांना बाटलीतून पाणी पिण्यास मदत केली. 


तिने एका हाताने बाटल धरुन पाणी पाजलं आणि दुसऱ्या हाताने आजोबांना पाठीला धरुन त्यांना आधार दिला. अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. थोड्याच वेळात एक व्यक्ती तिथे येतो आणि त्या मुलीला घेऊन जातो. एवढंच नाही तर त्या लहान मुलाला त्या आजोबांना टाटा करायला सांगतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं...


सोशल मीडियावर या चिमुकलीचं खूप कौतुक होतं आहे. तिच्या पालकांच्या संस्काराचंही नेटकरी आवर्जून प्रशंसा करत आहेत. आतापर्यंतचा सर्वात सुंदर आणि मनं जिंकणारा हा व्हिडीओ आहे. त्या चिमुकलीचं जेवढं कौतुक करु तेवढं कमी आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म हेच या छोट्याशा मुलीने आपल्याला शिकवलं आहे.