Earth Facts: पृथ्वी ताशी 1600 किमी वेगानं फिरते, आपल्याला याचा थांगपत्ताही कसा लागत नाही?
Earth Circumference: पृथ्वी आणि तिच्या उदरात दडलेली रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनीच केला. पण, अद्यापही या पृथ्वीची सर्वच रहस्य कुणासमोरही आलेली नाहीत. पृथ्वी म्हणजे जणू एक चमत्कारच म्हणावी.
Earth Facts: पृथ्वी, परिभ्रमण, परिक्रमण, सूर्यमाला, ग्रह- तारे या आणि अशा अनेक विषयांबद्दल आपण शालेय जीवनात शिकलो. भूगोलाचा अभ्यास करत असताना नकळतच आपणही या विश्वात हरपून गेलो. पण, तरीही काही माहिती जाणताना आजही आपण तितकेच थक्क आणि हैराण होतो जितकं आपण शालेय जीवनात झालो होतो.
तुम्हाला माहिततच असेल की पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरत असते. विश्वास बसणार नाही, पण पृथ्वी स्वत:भोवती साधारण ताशी 1609 किलोमीटर इतक्या अतीप्रचंड वेगानं फिरते. आपल्याला मात्र याची जाणिवही होत नसावी. पण, असं का आणि कसं शक्य आहे? यामागचं कारण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का?
जाणून घ्या शास्त्रीय कारण...
या विश्वात जे काही घडतं, त्यामागे काही शास्त्रीय कारणं दडलेली आहेत. त्यामागे विज्ञान आहे. पृथ्वीचं इतक्या वेगात फिरणं आणि आपल्याला ते न कळणं यामागेही विज्ञानच आहे माहितीये का? इथं एक बाब लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की, कोणत्याही गोष्टीच्या वेगाबद्दल आपल्याला तेव्हाच जाणीव होते जेव्हा त्या वेगात बदल होतो. अगदी त्याचप्रमाणं पृथ्वी स्वत:भोवती फिरतेय खरी, पण तिच्या वेगात मात्र सातत्य आहे. याच कारणामुळं आपल्याला या वेगाची जाणीव होत नाही.
हेसुद्धा वाचा : Moon: खरचं चंद्रावर पाणी आहे? शास्त्रज्ञांना सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाकाय पृथ्वीचा आकार पाहता तिच्यापुढं जीवसृष्टीचा भाग असणारे आपण अगदीच लहानगे आहोत. त्यामुळं सूर्याभोवती फिरणं असो किंवा मग स्वत:भोवती फिरणं असो, आपल्याला पृथ्वीचा वेग लक्षात येत नाही.
पृथ्वीविषयी आणखी रंजक माहिती...
असं म्हणतात की पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण 23 तास, 56 मिनिटं आणि 4 सेकंद इतका वेळ लागतो. पृथ्वीचा परिघ 40 हजार 75 किलोमीटरचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भूमध्य रेषेजवळील भाग साधारण 1600 किमी प्रतीतास इतक्या अतीप्रचंड वेगानं फिरतो.
- पृथ्वी सूर्यमालेतील सर्वात कमी तापमान असणारा ग्रह आहे.
- सध्याच्या घडीला जीवसृष्टी असणारा पृथ्वी एकमेव ग्रह आहे.
- पृथ्वीचं वय माहितीये? 4.543 billion वर्षे....
- पृथ्वीचा पूर्णपणे वर्तुळाकार नाहीये...
- पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी एक दिवस अवघ्या 6 तासांचाच होता. हे प्रमाण पुढे वाढत जाऊन आता एक दिवस 24 तासांचा असतो. आहे की नाही हे कमाल आणि अविश्वसनीय?