Lebanon Pagers Blast : सीरिअल ब्लास्टने लेबनान देश हादरला आहे. पेजर्स ब्लास्टमध्ये 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्ला या संघटनेचे सैनिक (Hezbollah Fighters) आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. या भीषण घटनेत इराणचे राजदूत (Iran Ambassador) मोजितबा अमानी हे देखील जखमी झाले आहेत. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. लेबनान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार सैनिक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजर्सचा वापर करत होते, आणि एकाच वेळी अनेक पेजर्सचा स्फोट झाला. सीरिअल ब्लास्ट दक्षिण लेबनान आणि राजधानी बेरुतसह अनेक ठिकाणी झालेत. हिजबुल्लाहच्या इतिहासातील सर्वात मोठी गुप्तचर त्रुटी म्हणून याकडे पाहिलं जात आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.45 वाजता हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे.


एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले आणि परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय. सोशल मीडिया आणि लेबनानी तसंच इजरायली मीडियाने स्फोटानंतरचे फोटो शेअर केले असून यात अनेक जखमी रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. स्फोटानंतर जखमींना दाखल करण्यासाठी रुग्णालयात अक्षरश: गर्दी झाली होती. स्थानिक रुग्णालयांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होती.



हॅकर्सने घडवले स्फोट?


सैनिकांचे पेजर हॅक  करुन हा हल्ला घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. हे सीरिअल पेजर ब्लास्ट इस्त्रायलने केल्यांचही बोललं जात आहे. एकाच वेळी अनेक पेजर्सचा स्फोट घडवून आणण्यात आला. काही रिपोर्टसने केलेल्या दाव्यानुसार अमेरिकेने बंदी घातलेल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटननेला टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला. अमेरिका आणि यूरोपीय संघाने हिजबुल्ला संघटनेवर बंदी घातली आहे. इराणकडून मात्र या संघटनेचं समर्थन केलं जातं.