International Day of Happiness : `हा` आहे जगातील सर्वात आनंदी देश; पाहा भारताचा नंबर कुठे
यंदाच्या वर्षाची माहिती मागील तीन वर्षांच्या काळात एकत्र केलेली आहे.
मुंबई : आज international day of happiness. सध्या संपूर्ण जगात युद्ध, विनाश, राजकीय डावपेच याच्याच चर्चा सुरु असताना दुसरीकडे एक राष्ट्र असं आहे, जे सर्वात आनंदी असल्याचा दावा करण्यात येत आहे. Sustainable Development Solutions Network नं नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत या राष्ट्राचं नाव समोर आलं आहे.
सलग पाचव्या वर्षी फिनलँड हा देश जगातील सर्वात आनंदी देश म्हणून गणला गेला आहे. सर्वोच्च 10 देशांच्या यादीत असणाऱ्या 5 नॉर्डिक देशांपैकी हा एक देश. (international day of happiness )
याखालोखाल डेन्मार्क, Iceland या देशांचा क्रमांक येतो. स्वीडन या यादीत सातव्या स्थानावर आहे. तर, नॉर्वे आठव्या स्थानावर.
जवळपास 150 देशांमधील नागरिक कसं आयुष्य जगतात या धर्तीवर ही यादी जाहीर केली जाते. यंदाच्या वर्षाची माहिती मागील तीन वर्षांच्या काळात एकत्र केलेली आहे.
देशाचा जीडीपी, सामाजिक पाठिंबा, आरोग्यदर, स्वातंत्र्य, भ्रष्टाचाराती पातळी आणि अशा अनेक घटकांच्या आधारे देशांची आकडेवारी निर्धारित केली जाते.
या यादीत कॅनडा, अमेरिका आणि युके अनुक्रमे 15, 16, 17 व्या स्थानावर आहेत. या यादीत सर्वात खालच्या स्थानावर असणाऱ्या देशांमध्ये अफगाणिस्तान, लेबनन, झिम्बाब्वे, रवांडा आणि बोस्तवाना यांचा समावेश आहे.
या यादीत भारत 136 व्या स्थानावर आहे. सर्वाधिक कमी आनंदी देशांच्या यादीत भारताचं स्थान आहे.
हे स्थान पाहता, देशातील सद्यपरिस्थिती आणि त्यामुळं कमी झालेला देशातील कमी झालेला आनंदाचा दर खूप काही सांगून जातो. आता याच परिस्थितीला आनंदात बदलण्यासाठी काय करता येईल यावर भर देणं महत्त्वाचं असेल.. नाही का?