बर्मिंघम: शांतीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफजई (Malala Yousafzai) हिचा निकाह नुकताच पार पडला. मंगळवारी तिनं असर मलिक याच्यासोबत आपल्या जीवनाची एक नवी सुरुवात केली. ट्विट करत मलालानं तिच्या जीवनातील या नव्या प्रवासाची माहिती सर्वांनाच दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलाला आणि असरच्या या निकाहसाठी दोघांच्याही कुटुंबीयांची उपस्थिती होती. ट्विट करत या आनंदी क्षणाबाबत सांगताना मलालानं लिहिलं, 'आजचा दिवस माझ्या जीवनातील एक अद्वितीय दिवस आहे. असर आणि मी एकदुसऱ्याची साथ देण्यासाठी या बंधनात अडकलो आहोत.'


मलाला आणि असरचा निकाह त्यांच्याच बर्मिंघममधील निवासस्थानी पारस पडला. येत्या काळातील सर्वच क्षणांसाठी आपण उत्सुक असल्याचं मलाला ट्विटच्या माध्यमातून म्हणाली. 


मलालाच्या पतीची ओळख.... 
मलालाचा पती, असर मलिक हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मॅनेजर पदावर काम करतो. याआधी तो पाकिस्तान सुपर लीगसाठी काम करत होता. एका प्लेअर मॅनेजमेंट कंपनीचं संचालनही त्यानं केलं आहे. लाहोर युनिवर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेजमधून त्यान 2012 ला अर्थशास्त्र आणि पॉलिटीकल सायन्समधून पदवी घेतली आहे. 



तलिबाननं मलालावर झाडलेली गोळी... 
पाकिस्तानमधील स्वात घाटीमध्ये मुलींच्या शिक्षणाचं समर्थन करणाऱ्या मलालाला 2012 मध्ये तालिबान्यांकडून शाळेतून परतत असताना गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी तिचं वय अवघं 15 वर्षे इतकं होतं. 


ब्रिटनमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. ज्यानंतर तिचे प्राण वाचले. पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठातून मलालानं शिक्षण पूर्ण केलं. 2014 मध्ये मलालाला नोबेलचा शांती पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी तिचं वय 17 वर्षे इतकं होतं. मलाला सर्वात कमी वयात नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्यांपैकी एक होती.