International womens day : जागतिक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण आणि जीवनातील इतर सर्वच महिलांना या दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. पण, याच महिला दिनानिमित्त काही गोष्टी किंवा काही प्रश्चांची उत्तरं ठाऊक असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून आश्चर्य वाटेल पण, गेल्या 100 वर्षांहूनही अधिक काळापासून हा दिवस साजरा केला जात आहे. 1911 मध्ये डेन्मार्क, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये महिला दिन साजरा करअय़ात आला. 2011 मध्ये या खास दिवसाला 100 वर्षे पूर्ण झाली. महिलांचं समाजासह प्रत्येक क्षेत्रात असणारं मोलाचं योगदान पाहता त्यांच्या या योगदानाचा सत्कार व्हावा या हेतूनं महिला दिन साजरा केला जातो. महिलांना मिळणारी वागणूक आणि समाजात असणारी असमानता याविरोधातही यानिमित्तानं सूर आळवण्यात आला. (International womens day 2023 interesting facts)


जागतिक पुरुष दिनाचं काय?


जागतिक महिला दिन वर्षानुवर्षे साजरा केला जात आहे. पण, दरवर्षी या दिवशी पुरुषांचा प्रश्न असतो, आमचं काय? आमच्यासाठी असा कुठला दिवस असतो का? तर याचं उत्तर आहे हो. (International men's day) 19 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून ओळखला जातो. साधारण 1990 पासून या दिवसाची सुरुवात झाली खरी पण, अद्यापही संयुक्त राष्ट्र संघटनेनं या दिवसाला अधिकृत मान्यता दिलेली नाही. 


हेसुद्धा वाचा : International Women Day 2023: 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो महिला दिन? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम


पुरुषांचं समाज, राजकारण, अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांमध्ये असणारं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्राथमिक स्तरावर हा दिवस 80 देशांमध्ये साजरा केला जातो. त्यामुळं पुरुषांनो, तुम्हीही तितकेच महत्त्वाचे आहात याचीही जाण आहे बरं! 


खास दिवसासाठी खास रंग 


पुन्हा वळूया महिला दिनाकडे. हा दिवस खास असल्यामुळं तो खास पद्धतीनं साजराही केला जातो. हिरवा, जांभळा आणि पांढरा हे रंग जागतिक महिला दिनाचे प्रतीक आहेत. हिरवा रंग आशा, सकारात्मकता, पांढरा रंग पावित्र्य आणि शांतता तर, जांभळा रंग न्यायाचं प्रतीक समजला जातो. या दिवशी अनेक राष्ट्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येते, तर काही देशांमध्ये महिलांना कामावर अर्ध्याच दिवसासाठी बोलवलं जातं. तुमच्याइथं महिला दिन कसा साजरा होतोय?