वडील हयात असते तर डॉक्टर झाली असती गुरुदत्त आणि देव आनंद यांची सर्वात आवडती हिरोईन!
Entertainment : एकेकाळी हिंदी, तेलुगु, तमिळ आणि बंगाली चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्रीला डॉक्टर व्हायचं होतं. या अभिनेत्रीला पद्मभूषण पुरस्कार आणि दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
1/7
2/7
3/7
भरतनाट्यम आणि शास्त्रीय संगीतात त्या पारंगत होत्या. त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. पण झालं असं की, त्या 13 वर्षांच्या असताना वडिलांचं निधन झालं. त्यावेळी कुटुंबाची परिस्थिती पाहून वहिदा यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न विसरून त्यांनी पैशांसाठी चित्रपटसृष्टीचा रस्ता पकडला.
4/7
सीआयडी या चित्रपटासाठी गुरू दत्तने ऑफर दिली. दिलीप कुमार आणि मधुबाला यांना वाटलं की, वहिदा यांनी त्यांचं स्क्रीनचं नाव बदलावं . त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्याशिवाय त्यांनी दोन अटी ठेवल्यात. त्यांची आई सेटवर येईल आणि चित्रपटातील वेशभूषा त्या ठरवतील. उघडे किंवा बिकीनीसारखे कपडे त्या परिधान करणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
5/7
17 वर्षांच्या वहिदा यांचं स्पष्टवक्तेपणा पाहून गुरु दत्त त्यांच्या प्रेमात पडले. हळूहळू त्यांचं प्रेम फुलत गेले. पण गुरु दत्त आधीच विवाहित होते. त्यांची प्रेमाच्या बातम्या सगळीकडे पसरल्या. ही बातमी गुरु दत्त यांच्या पत्नी गायिका गीता दत्त यांना कळल्या आणि त्यांच्या नात्यात तणाव वाढला. दुसरीकडे वहिदा यांच्या घरच्यांचाही या नात्याला विरोध होता. हे सगळं गुरु दत्त यांना असह्य झालं आणि त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.
6/7
7/7