16 हजार फूट उंच विमातून खाली पडला iPhone; तुटणं फुटणं लांबच साधा एक स्क्रॅचही नाही
कोणतीही ड्रॉप टेस्ट न देता एका अपघाताच्या माध्यमातून आयफोनने आपली मजबुती सिद्ध केली आहे. 16 हजार फूट उंचीवरुन पडूनही या आयफोनला काहीच झालेले नाही.
iphone Drop Test : मजबुती आणि सुरक्षेच्या बाबतीत iphone ला कुणीही टक्कर देऊ शकत नाही असा दावा Apple कंपनीतर्फे नेहमीच केला जातो. आयफोनच्या मजबुतीबाबतचा दावा खरा ठरणारा प्रकार घडला आहे. 16 हजार फूट उंचीवर उडणाऱ्या विमातून iPhone खाली पडला. एवढ्या उंचीवरुन iPhone खाली पडून तुटणं फुटणं लांबच पण साधा एक स्क्रॅचही आला नाही. याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
नेमका काय आहे प्रकार?
16 हजार फूट उंच विमातून खाली पडूनही या iphone ला काहीच झाले नसल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. Alaska Airlines चे ASA 1282 हे फ्लाइट हवेत उडत असताना हा iphone खाली पडला. SA 1282 हे फ्लाइट पोर्तुगालमधील ओरेगॉन शहरापासून कॅलिफोर्नियातील ओंटारियो शहराकडे उड्डाण करत होते. या दरम्यान विमान 16 हजार फूट उंचीवर उडत असताना विमानाची खिडकी अचानक तुटली. यावेळी iphone 16 हजार फूट उंच विमातून खाली पडला. अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) या विचित्र अपघाताची माहिती दिली. विमान लँड झाल्यानतर विमानातून पडलेल्या आयफोनचा शोध घेण्यात आला. रस्त्याच्या कडेला हा आयफोन सापडला. स्क्रीन प्रोटेक्टर आणि त्याचे कव्हर चांगल्या स्थितीत होते. आयफोनला साधा स्क्रॅच देखील आला नाही.
विमानातून पडलेल्या फोनचे फोटो व्हायरल
विमानातून पडलेल्या iphoneचे फोटो आणि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हा आयफोन रस्त्याच्या कडेला सुस्थितीत पडलेला दिसत आहे. 16 हजार फूट उंचीवरून पडलेले हे आयफोनचे कोणते मॉडेल आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Seanathan Bates या व्यक्तीने @SeanSafyre या X हँडलवरुन हे फोटो शेअर केले आहेत. हजारो युजरनी यावर कमेंट केल्या आहेत. हजारो युजर्सनी ही पोस्ट रिशेअर केली आहे.
आयफोनऐवजी बॉक्समधून चक्क विमाबार निघाले
ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून आयफोन मागवणं एका तरूणाला चांगलच महागात पडलंय. या तरूणानं अँमेझॉनवरून आयफोन मागवला मात्र आयफोनऐवजी बॉक्समधून चक्क विमाबार निघाले. भाईंदरमधील दर्पण माछी या तरूणाच्या बाबतीत हा प्रकार घडलाय. त्यानं 6 ऑक्टोबरला आयफोन बुक केला होता. 10 तारखेला डिलिव्हरी आली तेव्हा त्यानं आनंदाने बॉक्स उघडला. मात्र त्यात आयफोनऐवजी तीन विमबार साबण आढळून आले. या तरूणानं अॅमेझॉनच्या कस्टमर केअरला फोन केला असता त्यांनी आमची चुकी नसल्याचं सांगून हात वर केले आहेत. आपली 46 हजारांची फसवणूक झाल्याचा आरोप या तरूणानं केलाय.