Iran Attack Pakistan: जगाच्या पाठीवर सध्या अनेक राष्ट्रांमध्ये वाद, मतभेद आणि युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच त्यात आणखी एका राष्ट्राचाही समावेश झाला आहे. शिया मुस्लीम बहुल राष्ट्र इराणनं दहशतवादी कारवायांमुळं कुप्रसिद्ध असणाऱ्या पाकिस्तानवर हवाई हल्ला चढवला आहे. इराणच्या लष्करातील वायुदलानं पाकिस्तानात असणाऱ्या जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर मंगळवारी एअर स्ट्राईक करत हे तळ उध्वस्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराणमधील वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तानाला केंद्रस्थानी ठेवत तिथं असणाऱ्या कोह-सब्ज़ प्रांतामध्ये जैश अल-अदल दहशतवाद्यांचा मुख्य तळ होता. याच तळाला इराणच्या वायुदलानं निशाण्यावर घेत क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यानंतर पाककडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याचा कांगावा करण्यात आला. इस्लामाबादमधून पाक यंत्रणांनी इराणचा हा हल्ला म्हणजे विनाकारण हवाई क्षेत्रीय सीमांचं उल्लंघन असल्याचं म्हणत या हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, इराणकडून मात्र या हल्ल्याची सविस्तर माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. 


हेसुद्धा वाचा : Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, 'इथं' धुक्याची चादर 


पाकिस्तानची कारवाई अस्वीकारार्ह असून, या हल्ल्यामध्ये निष्पाप लहान मुलांना जीव गमवावा लागल्याचं सांगत पाकनं कटू शब्दांत निषेध नोंदवला. दहशतवाद हा सर्व देशांसाठी एक मोठं आव्हान असून, त्यासाठी एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज असल्याचीच बाब आम्हीही मांडत असल्याचं डोळे चमकवणारं वक्तव्य पाकनं करत शेजारी राष्ट्रांकडून करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे द्विपक्षीय विश्वासाला तडा जाणं, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.