इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला
Tension in Iran Pakistan: इराणमध्ये तीन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या घटनेत 9 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे.
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बदुंकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांचा शोध सुरू असून गोळीबाराच्या घटनेनंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले होते. या घटनेनंतर पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद मुदस्सिर टीपू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. सरावन येथे 9 पाकिस्तानी नागरिकांच्या निर्घृण हत्येचा मोठा धक्का बसला आहे. दूतावास त्यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त करत आहे. आम्ही इराणला या प्रकरणी पूर्ण मदत करण्याचा आग्रह केला आहे.
या घटनेवर इरानच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने इरानमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली नाहीये. घटनेत मृत्यू पावलेले हे पाकिस्तानी मजूर असून गॅरेजमध्ये काम करायचे आणि तिथेच राहायचे. या घटनेत तीन पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूव्यतिरिक्त अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी परदेशी मंत्रालयाचे प्रवक्ता जहरा बलूच यांनी म्हटलं आहे की, ही एक धक्कादाय व निर्घण घटना आहे. आम्ही स्पष्टपणे या घटनेचा विरोध करतोय. आम्ही इराणच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या घटनेप्रकरणी तातडीने चौकशी करावी आणि यात सहभागी असलेल्या लोकांवर कठोप कारवाई करण्याची मागणी करत आहोत.
ईराणी परदेशी मंत्रालयाचे प्रवक्ता नासिर कनानू यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ही घटना ईराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीराबदोल्लाहियान यांच्या प्रस्तावित पाकिस्तान दौऱ्याच्या आधी घडली आहे. सोमवारी त्यांचा पाकिस्तानात दौरा आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ईराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंधां नुकसान पोहोचवण्याची कोणालाच परवानगी नाहीये, अशा कठोर शब्दांत त्यांनी ताकिद दिली आहे.
दरम्यान, या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि दहशतवादी आणि त्याचबरोबर ड्रग्स तस्करांसोबत चकमकी घडत असतात. ईराणमध्ये इंधनाची किंमत सर्वात कमी आहे आणि याच कारणामुळं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात इंधनाची तस्करी होत आहे.