Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा अजरबैजानच्या सीमेनजीक झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू ओढावला आणि संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेनं वेधलं. रईसी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते त्या हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या सर्व प्रवाशांचा मृत्यू या अपघातात ओढावला. सध्याच्या घडीला रईसी यांच्या मृत्यूसंदर्भातील अधिकृत माहिती समोर आली असून, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेषही हाती लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रईसी यांच्या मृत्यूनंतर आणखी एका विषयानं डोकं वर काढलं असून, हा अपघात आहे की षडयंत्र यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या घडीला या अपघातासंदर्भात कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण, या संपूर्ण प्रसंगामध्ये इस्रायलच्या भूमिकेसंदर्भात मात्र संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं समजत आहे. इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर या अपघातात कोणीही बचावलं नसल्याचा दावा करणारं वृत्त इस्रायली वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं, ज्यामुळं या घटनेसंदर्भात संशयानं डोकं वर काढलं. 


प्राथमिक स्तरावर रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात खराब हवामानामुळं झाल्याचतं सांगण्यात आलं. पण, अद्याप कोणत्याही कारणावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. झी न्यूजशी संवाद साधतना सदर घटनेविषयी संरक्षण तज्ज्ञ निवृत्त मेजर जनरल अश्विनी सिवाच यांनीही काही गोष्टींसंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी एका बहुचर्चित शक्यतेवर जोर देत जिथं हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची घटना घडली तिथं, अजरबैजानच्या सीमेत येणाऱ्या त्या परिसरात मोसाद प्रचंड सक्रिय असल्याचं स्पष्ट केलं. 


हेसुद्धा वाचा : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरमधील अखेरचा व्हिडीओ समोर


 


आपल्या वक्तव्याला आधार देत त्यांनी भूतकाळातील काही घटनांचा उल्लेखही केला. अरमेनिया आणि इस्राइल यांच्यात जेव्हा संघर्ष पेटला होता तेव्हा इस्रायल अजरबैजानच्या बाजूनं उभा होता. किंबहुना इस्रायलनं दिलेल्या ड्रोनमुळंच अजरबैजान हे युद्ध जिंकू शकला होता. ही झाली नाण्याची एक बाजू. पण, या घटनेवर थेट न देता सध्या मात्र इस्रायलनं अतिशय सावध भूमिका घेतली आहे. ही घटना खराब हवानामुळंच झाल्याचं म्हणत आपला याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं इस्रायलनं स्पष्ट केलं आहे. 


इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा इतका भीषण अपघात झाल्याचं वृत्त कळताच परिस्थितीचं गांभीर्य आणि त्याचे इतर संभाव्य पैलू लक्षात घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तातडीची बैठक बोलावली. राहता राहिला प्रश्न हा खरंच घातपात होता की अपघात, तर यासंदर्भातील अधिकृत वृत्ताकडेच सर्वांच्या नजरा आहेत. 


राष्ट्राध्यक्षांना संपवणारं ऑपरेशन एजॅक्स


उल्लेखनीय बाब म्हणजे, इस्रायलवर आज इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचे आरोप होत असले तरी 1953 मध्ये असे प्रत्यक्षात घडले होते. त्यावेळी इराणच्या पहिल्या लोकशाही निवडणुकीत निवडून आलेले पहिले पंतप्रधान मोहम्मद मोसाद्देक यांची हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी त्यांच्याविरोधात कथित लोक आंदोलन सुद्धा भडकले होते. परंतु, तेलाच्या आणि पैशांच्या राजकारणासाठी हे सर्व काही अमेरिका आणि ब्रिटनने घडवून आणल्याचे नंतर उघडकीस आले.


अर्थात त्यांची हत्याच नव्हे तर लोक आंदोलन सुद्धा भाडोत्री गुंडांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या गुप्त मोहिमेला Operation Ajax (ऑपरेशन एजॅक्स) असे नाव देण्यात आले होते. ऑपरेशनच्या 64 वर्षानंतर या देशांनी त्यासंदर्भातील कागदपत्र जाहीर करत खुलासा केला.