मुंबई : जगभरात वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलने होत असतात. आंदोलक आपली दखल घेतली जावे याकरता कायमच वेगवेगळी शक्कल लढवत असतात. आंदोलक वेगवेगळ्या कल्पना वापरून आपली मागणी ठामपणे मांडत असतात. तर आंदोलकांना शमवण्यासाठी लाठीचार्ज, आश्रूधुराचे गोळे ते पाण्याचे फवारे वापरले जातात. पण इराकमध्ये आंदोलकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराकची राजधानी बगदाद शहराच्या दक्षिणेकडील भागात सत्ताधारी सरकारविरोधात आंदोलन पुकारले गेले. आंदोलकांना ताब्यात आणण्यासाठी जवानांनी आणि पोलिसांनी पाळीव श्वानांची मदत घेतली. त्यांना श्वानपथकाला रस्त्यावर आणलं. याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी चक्क साखळदंडाने बांधलेले सिंहच रस्त्यावर आणले. सिंहसमोर आल्यामुळे जवानांचे श्वान पळून गेले. 



इराकमध्ये भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी यासारख्या मुद्यांवर सरकार विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले. 1 ऑक्टोबरपासून सतत निदर्शने होत आहे. इराकमध्ये जेव्हापासून सरकार विरोधात कारवाई सुरू केली तेव्हापासून 300 हून अधिक सामान्य नागरिक मारले गेले आणि 10 हजाराहून अधिक लोकं जखमी झाले. 



इहा (EHA) न्यूजचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तसेच बाबेल परिसरामधील या घटनेचा व्हिडिओ ‘द इंडिपेंडट’ने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत सिंहाला इराकचा राष्ट्रध्वज गुंडालेला दिसत आहे.