अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात इरमा चक्रीवादळाचं थैमान
अमेरिकेनवेळेनुसार रविवारी फ्लोरिडाच्या किनारी असलेल्या मियामी शहरात ताशी २०९ किलोमीटर वेगानं वारे वाहत होते.
फ्लोरिडा : अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात इरमा चक्रीवादळानं थैमान घातलंय. अमेरिकेनवेळेनुसार रविवारी फ्लोरिडाच्या किनारी असलेल्या मियामी शहरात ताशी २०९ किलोमीटर वेगानं वारे वाहत होते.
गेल्या शतकातलं सर्वात भीषण चक्रीवादळ म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या इरमानं मियामी शहरात मालमत्तांचं मोठं नुकसान झालंय. तीन जणांचा बळी गेलाय. पण प्रशासनानं राबवलेल्या मदत कार्यानं बहुतांश नागरिकांच्या जीवितालाही कुठालाही धोका झालेला नाही.
वादळाच्या भीतीनं ५६ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. वादळ जेव्हा शहरात धडकलं, तेव्हा १० फूट उंच लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. शहरातला वीज पुरवठा खंडीत झालाय.
वादळाची दहकता आता कमी झाला असला, तरी जीविताला धोका कायम आहे. इरमा जेव्हा किना-यावर धडकलं. तेव्हा त्याची तीव्रता ५ होती. आता ती ४ झाली आहे..दरम्यान कॅरेबियन बेटांवर इरमा वादळानं आधीच २४ जणांचा बळी घेतलाय.