Big News : एक महासागर जन्म घेतोय! आफ्रिका खंडाचे तुकडे होणार पण...
Africa Breaking In Two Parts : पायाखालची जमीन खऱ्या अर्थानं हादवणारी बातमी. कारण, इथं होतायत एका खंडाचे तुकडे. आपण या घटनेपासून किती दूर? आताच पाहून घ्या....
Africa Breaking In Two Parts : शालेय जीवनात आपण जो (Geography) भुगोलाचा विषय शिकलो त्यामध्ये येत्या काळात बरेच बदल होणार आहेत. कारण, भुगर्भात होणाऱ्या असंख्य हालचालींचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. हे परिणाम इतके गंभीर आहेत की हा मुद्दा फक्त जगाच्या भौगोलिक रचना बदलण्यापुरताच सीमित राहत नसून, जगाच्या किंबहुना पृथ्वीच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
थेट मुद्द्याचं बोलायचं म्हणजे, (Africa) आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होण्यास सुरुवात झाली असून, या घटनेतून एका (Ocean) महासागराचा जन्म होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. Geophysical Research Letters मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातून ही माहिती पुन्हा प्रकाशझोतात आली.
Continent rifting म्हणजे काय?
rifting म्हणजे एका tectonic plate चे दोन किंवा त्याहून अधिक पदर मोकळे होणं. यामुळं मैदानी भागात rift valley तयार होते. या प्रकारच्या दऱ्या जमिनीसोबतच समुद्राच्या तळाशीही तयार होऊ शकतात. ही अतीव महत्त्वाची घटना साधारण 138 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिका, विभाजित होऊन दोन देशांचा जन्म झाला होता. NBC च्या वृत्तानुसार मागील कैक हजारो वर्षांमध्ये अरेबियन पृष्ठ आफ्रिकेपासून वेगळा झाला, ज्यामुळं तांबडा समुद्र आणि Gulf of Aden चा जन्म झाला होता.
हा संपूर्ण प्रकार 2005 मध्ये उघडकीस आला ज्यावेळी 35 मैल दूरवर पसरलेली एक भेग इथिओपियाच्या वाळवंटी प्रदेशात पाहायला मिळाली होती. या भौगोलिक बदलामुळं एक नवा महासागर जन्मास येऊ शकतो. ही भेग आफ्रिकन न्युबियन, आफ्रिकन सोमाली आणि अरेबियन या तीन tectonic plates लगत पाहिली गेली.
हेसुद्धा वाचा : Comfort Women... सैनिकांची शारीरिक भूक भागवणाऱ्या या महिलांना विसरुन चालणार नाही
या संपूर्ण प्रक्रियेसाठी हजारो वर्षांचा काळ लागणार असला तरीही ही बाब अतिशय गंभीर आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार म्हणायचं झाल्यास नवा महासागर जन्मण्यास साधारण 5 ते 10 कोटी वर्षांचा कालावधी लागू शकतो. ज्यामुळं युगांडा आणि झांबिया या देशांना त्यांचा स्वतंत्र समुद्रकिनारा लाभेल. भेग पडल्यावर दुभागलेल्या खंडातून नव्यानं उदयास आलेल्या खंडात आजच्या दिवसातील सोमालिया आणि केन्याचा काही भाग, इथिओपिया आणि टांझानिया या राष्ट्रांचा समावेश असेल.
पृथ्वीच्या उदरात सुरु असणाऱ्या प्रत्येत घडामोडीचे मानवी आयुष्यावर थेट परिणाम होणार आहेत ही त्याचीच चाहूल म्हणायला हरकत नाही. अर्थात हा बदल घण्यास मोठा कालावधी शिल्लक असला तरीही ही बाब अतिशय महत्त्वाची आहे हे मात्र नाकारता येणार नाही.