पॅरिस : अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने २०११ मध्ये ठार केले. त्यानंतर त्याची दहशतवादी संघटना कमजोर पडू लागली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता असे मानले जात आहे की, या संघटनेची धुरा आता लादेनचा मुलगा हमजा सांभाळण्याची शक्यता आहे. तो दहशतवाद्यांचा नवा म्होरक्या बनण्याची शक्यता आहे. ९/११ ला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या जखमा ओल्या असताना अल-कायदाने एक फोटो मोंटाज जारी केला होता. त्यात ट्विन टॉवर्सच्या धुरळ्यात ओसामा बिन लादेनचा चेहरा दिसत आहे. लादेनच्या जवळच त्याचा मुलगा हमजा सुद्धा उभा दिसत आहे. हमजा हा बालपणापासूनच ओसामासोबत राहत असे आणि आता तो २८ वर्षांचा झालाय. 


आता अधिकारी आणि विश्लेषकांचं म्हणणं आहे की, इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना कमजोर पडल्याचा फायदा घेऊन हमजा आता जगभरातील जिहादींमध्ये एकता कायम करण्याचं काम करू शकतो.


कॉम्बॅटिक टेररिझम सेंटरच्या एका रिपोर्टमध्ये FBI चे माजी स्पेशल एजंट आणि अल-कायदाचे स्पेशलिस्ट अली सूफान यांनी लिहिले की, ‘आता हमजा २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा झालाय आणि तो त्या संघटनेचं नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. लादेनच्या वंशातील असल्याने अनेक जिहादी नेत्यांकडून त्यालाच नेता निवडले जाईल. अशात इस्लामिक स्टेट कमजोर झाली आहे. त्यामुळे जगभरातील जिहादींना एकत्र आणण्यासाठी हमजा सर्वात चांगला दावेदार मानला जाईल’.


लादेनच्या २० मुलांपैकी १५वा आणि तिस-या पत्नीकडून झालेला हमजा याला बालपणापासूनच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे शिकवण्यात आले आहे. इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, ९/११ हल्ल्यापूर्वी कसं चालवायचं हे हमजाला शिकवलं होतं.अनेक व्हिडिओजमध्ये तो अमेरिके विरोधात बोलताना दिसला आहे.


ओसामाला संपवल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलगा हमजा याला अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर इराणमध्ये. इथे त्यांना अनेक वर्ष नजरकैदेत ठेवण्यात आलं. सध्या हमजा कुठे आहे याची काहीच माहिती नाहीये. हमजा २२ वर्षांचा होता तेव्हा त्याने एका पत्रात लिहिले होते की, ‘मी स्वत:ला लोखंडासारखा समजतो, मी जिहादच्या मार्गावर आहे’.