गाझा : इस्रायलवरील हवाई हल्ल्यात शनिवारी गाझामधील बहुमजली इमारतीवर हल्ला करुन ती पाडण्यात आली. या इमारतीमध्ये अनेक विदेशी वृत्तवाहिन्यांचे कार्यालये उपस्थित होते. अल जझीराचे कार्यवाहक महासंचालक डॉ. मुस्तफा सवेग म्हणाले, "अल जझिरा आणि इतर माध्यम संस्था कार्यालये ठेवलेल्या गाझामधील अल-जाला टॉवरवर हल्ला करणे हा मानवाधिकारांचे उल्लंघन करणे आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा युद्ध गुन्हा मानला जातो."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल जझीरा यांनी एक निवेदनात म्हंटले आहे की, इस्त्रायली सरकारचे हे करण्यामागील उद्दीष्टे हे माध्यमांना शांत करणे आणि गझामध्ये जे घडत आहे ते जगासमोर येऊ देऊ नये आहे. पत्रकार आणि माध्यम संस्थानांना निशाणा करण्याच्या या कारभारावर कडक टीका करावी आणि इस्राईलला जबाबदार धरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पावले उचलावीत असे आवाहनही त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.


त्यावर व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन सासाकी यांनी ट्वीट केले की, "आम्ही थेट इस्रायलला सांगितले आहे की, सर्व पत्रकार आणि माध्यमांची स्वतंत्रता आणि सुरक्षा महत्त्वाची आहे आणि ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे."



वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, अल जझीराच्या यरूशलम ब्युरोचे प्रमुख वलीद अल-ओमारी म्हणाले, "हे स्पष्ट झाले आहे की, ज्यांनी हे युद्ध छेडले आहे त्यांना फक्त गाझामध्ये कहर आणि मृत्यू पसरायचा नाही आहे, तर माध्यमांनाही गप्प बसवायचे आहे. गाझामध्ये जे काही घडत आहे याचे सत्य आम्ही पाहत आहोत आणि त्यावर अहवाल देत आहे "