तेहरान : इस्राईलचा सर्वात मोठा शत्रू आणि सिरियामधील इराणचा माजी राजदूत अली अकबर मोहताश्मीपोर (Ali Akbar Mohtashamipor) याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी मोहताश्मीपोरला मारण्यासाठी मोसादने (Mossad) पुस्तक बॉम्बने पाठवला होता. परंतु  मोहताश्मीपोरचं नशीब इतकं चांगलं की, तो या हल्ल्यापासून बचावला, परंतु त्या हल्ल्यात त्याने त्याचा एक हात मात्र गमावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला रुहोल्ला खामेनीचा विश्वासू सहकारी असलेल्या या अली अकबरने 1970 च्या दशकात पश्चिम आशियामध्ये मुस्लिम अतिरेकी गटांशी युती केली.


इस्लामिक क्रांतीनंतर त्याने इराणमध्ये रेव्होल्यूशनरी गार्ड या अर्धसैनिक बलाची स्थापना केली. नंतर, सीरियाचे राजदूत म्हणून, त्याने या प्रदेशात सैन्य घेतले, जिथे त्याला हिजबुल्ला प्रस्थापित करण्यास मदत मिळाली. त्यांनंतर त्याने इस्लामिक रिपब्लीकच्या धर्मावर आधारीत राजवटीला आतून वळण देण्याच्या अपेक्षेने हळूहळू तो सुधारकांच्या बाजूने झाला.


2009 मध्ये त्याने इराणचे तत्कालीन राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद विरुद्ध झालेल्या वादग्रस्त विजयानंतर, देशातील हरित चळवळीत विरोधी नेते मीर हुसेन मौसवी आणि महदी करौबी यांचे समर्थन केले. अली अकबर त्यावेळी म्हणाला होता की, कोणतीही सत्ता लोकांच्या इच्छेसमोर टिकू शकत नाही.


त्यानंतर आता अली अकबरचा मृत्यू उत्तर तेहरानमधील रुग्णालयात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.


अली अकबरचा जन्म 1947 मध्ये तेहरानमध्ये झाला होता. अली अकबरला शाह मोहम्मद रजा पहलवी यांनी इराणमधून हाकलून लावले होते. नंतर तो नजफ येथे राहत होते. पत्रकार रोनेन बर्गमॅन यांच्या 'राइस एंड किल फर्स्ट' या पुस्तकानुसार, इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादने 1984 मध्ये व्हॅलेंटाईन डेनिमित्त अली अकबरला ठार करण्यासाठी पुस्तक पाठवले होते, ज्यात एक बॉम्ब होता.


अली अकबरने पुस्तक उघडताच त्या स्फोटात त्याचा उजवा हात आणि डाव्या हाताची दोन बोटे गेली. परंतु या घटने नंतरही अली अकबर इराणचा अंतर्गत व्यवहार मंत्री झाला.